कोल्हापूर

स्वतंत्र पथकाच्या माध्यमातून ज्येष्ठ साहित्यिक श्याम कुरळे यांचा शोध सुरू

CD

स्वतंत्र पथकाच्या माध्यमातून
साहित्यिक श्याम कुरळे यांचा शोध सुरू

जिल्हा पोलिस प्रमुखांनी केली पथकाची नियुक्ती
कोल्हापूर, ता. १३ : सानेगुरुजी वसाहत येथील घरातून साहित्यिक श्याम कुरळे बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांनी स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकामध्ये उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह पाच कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे.
स्मृतिभ्रंशाचा आजार जडलेले साहित्यिक श्याम कुरळे हे २१ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सानेगुरुजी वसाहत येथील त्यांच्या घरातून बाहेर पडले होते. औषधाच्या गोळ्या आणण्याच्या निमित्ताने ते घराबाहेर पडले होते. ते घरी परतले नसल्याने नातेवाइकांनी शोध सुरू केला. याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. शहरात देखील कुरळे यांच्या छायाचित्रासह विविध ठिकाणी फलक लावण्यात आले. पण, महिना होत आला, तरी त्यांचा शोध लागत नसल्याने आता पोलिस अधीक्षक पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कुरळे यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली आहे. त्या पथकाने कुरळे यांचा शोध सुरू केला आहे. सानेगुरुजी वसाहत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

Salman Agha Runout: आधी रनआऊट झाला अन् मग हेल्मेट फेकलं... पाकिस्तानच्या सलमान आघावर ICC ची कारवाई

Maharashtra State Cooperative Bank : राज्य बँक ठरली यूपीआय स्वीकारणारी देशातील पहिली शिखर बँक

LPG Gas: गॅस तुटवड्याच्या काळात उज्ज्वला गॅस योजनेचं काय झालं? खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा, म्हणाल्या...

VIDEO : लिफ्टमध्ये अडकला सात महिन्यांच्या चिमुकल्याचा हात, पुण्यातील घटना; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर...

SCROLL FOR NEXT