कोल्हापूर

कर्नाटक

CD

कर्नाटकातील काँग्रेस आमदार एकसंध ः सिद्धरामय्यांनी

बंगळूर, ता. १३ : कर्नाटकातील काँग्रेसचे आमचे आमदार विकले जाणार नाहीत. सर्व आमदार एकसंध आहेत. बहुमतातील काँग्रेस सरकार कोणालाही पाडता येणे शक्य नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. उलट महाराष्ट्रातील सरकारच कोसळेल, असा पलटवार सिद्धरामय्या यांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात महाराष्ट्राप्रमाणे ‘घटना’ होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार पडू शकते, असे संकेत दिले आहेत. त्यावर कर्नाटकात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, ‘‘शिंदे यांचे सरकार टिकेल की नाही, याबाबत शंका आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्थलांतरित झालेले आता मातृपक्षात परतत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आमच्या पक्षाचे म्हणजेच महाआघाडीचे सरकार येईल. पराभवाच्या भीतीने पंतप्रधान उद्धव ठाकरेंवर टीका करीत आहेत.’’
-------
‘नाथ ऑपरेशन’द्वारे सरकार पडेल ः शिंदे
सातारा, ता. १३ ः महाराष्ट्रातील सातारा येथे बोलताना शिंदे म्हणाले, ‘मी नुकताच कर्नाटकात सभेला गेलो होतो. ‘नाथ ऑपरेशन’ कर्नाटकातही काम करेल. तेथील मतदार ‘नाथ ऑपरेशन’ म्हणजे काय, असे विचारले. ‘नाथ ऑपरेशन’द्वारे कर्नाटकात काँग्रेसचे सरकार राहणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात येण्याचे निमंत्रण कर्नाटकातील नेत्यांनी आपल्याला दिले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT