कोल्हापूर

संभाजी महाराज जयंती मिरवणूक

CD

83541 ः फरीगदग्याची प्रात्यक्षिके सादर करताना संस्थेचे मावळे

भिरभिरत्या काठ्या अन् लेझीमचा ठेका
कोल्हापूर, ता. १४ : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त बालचमूने मिरवणुकीने अभिवादन केले. पापाची तिकटी येथील संभाजी महाराजांच्या स्मारकाचे पूजन करून ही मिरवणूक सुरू झाली. कै. आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित मिरवणुकीत दोनशेंहून अधिक शिबिरार्थ्यांनी लाठी, लेझीम, दांडपट्टा प्रात्यक्षिके सादर केली. महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे अर्ध शिवाजी पुतळा चौकात मिरवणुकीची सांगता झाली.
पापाची तिकटी येथील संभाजी महाराज स्मारकाचे पूजन माजी स्थायी समिती सभापती विजय साळोखे, माजी महापौर ईश्वर परमार, संस्थेचे प्रमुख पंडित पोवार यांच्या हस्ते झाले. ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. शंभरावर शिबारार्थींच्या हातात एकाचवेळी लाठी फिरत असल्याने महाद्वार रोडवर सळसळता उत्साह दिसून येत होता. हलगीच्या ठेक्यावर शंभरहून अधिक विद्यार्थ्‍यांचे लेझीमचे सादरीकरण पाहण्यासाठी शहरवासीयांनी गर्दी केली होती. तसेच परजिल्ह्यातून अंबाबाई दर्शनाला आलेले पर्यटकही प्रात्यक्षिके पाहून अचंबित झाले.
मिरवणूक महाद्वार रोड, महाद्वार चौक, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे निवृत्ती चौकात आली. या ठिकाणी संस्थेच्या सदस्यांनी लाठीकाठी, दांडपट्टा, डबल लाठी, लिंबू काढणी, नारळ फोडण्याची चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर केली. मिरवणुकीत रवी दुर्गे, निखिल पोवार, गायत्री यादव, कल्याणी चाबूक, विक्रम शिंदे, उमेश कोडोलीकर, विनय गुरव, सुप्रिया शिंदे, अथर्व पोवार, ऋषिकेश पाटील, अनुजा पोवार, सायली सूर्यवंशी, विजय पाटील, यशराज सावेकर, मधुरा पोवार, संजय पाटील, संजय चव्हाण, अतुल महेकर, अनीष पाटील, निकिता पोवार, दुर्वा माने, हर्ष शिंदे, सर्वेश पोवार, भूमी पाटील, प्रगती पाटील, अक्षरा पाटील, पीयुष पाटील, अथर्व केंबळे, सोहा पठाण, सार्थक कदम, देवामृत नाधवडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT