कोल्हापूर

महावितरणच्या ‘गो ग्रीन’ योजनेत पुणे परिमंडळ आघाडीवर

CD

‘गो ग्रीन’ योजनेत २७ हजार ग्राहक सहभागी
ःमहावितरणचे कोल्हापूर परिमंडल; वीजबिलाच्या कागदाऐवजी ''ई-मेल'' व ''एसएमएस''चा पर्याय
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : महावितरणच्या गो-ग्रीन योजनेंतर्गत वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील १ लाख ८४ हजार २२० वीजग्राहकांनी केवळ ''ई-मेल'' व ''एसएमएस''चा पर्याय निवडला आहे. यामुळे त्यांची तब्बल दोन कोटी २१ लाख रुपयांची वार्षिक बचत झाली आहे. तर या योजनेत पुणे परिमंडलातील एक लाख २३ हजार वीजग्राहकांनी राज्यात सर्वाधिक संख्येने सहभाग घेतला आहे. यामध्ये कोल्हापूर परिमंडलातील २७ हजार ७९ ग्राहकांचा समावेश आहे.
या योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ''ई-मेल'' व ''एसएमएस''चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वार्षिक १२० रुपयांची वीजबिलांमध्ये बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ''गो-ग्रीन''मधील ग्राहकांना ''ई-मेल''द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ''एसएमएस''द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा त्वरित लाभ घेणे आणखी शक्य झाले आहे. दिवसेंदिवस पर्यावरणात प्रतिकूल बदल होत आहे. त्यामुळे पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी ''गो-ग्रीन'' योजना ही काळाची गरज झाली आहे. वीजबिलाची सॉफ्ट कॉपी जतन करून ज्यावेळी आवश्यकता असेल तेव्हा वीजबिलाची कागदी प्रिंट काढता येते. त्यामुळे कागदी मासिक बिलाचा वापर बंद करून गो-ग्रीन योजनेत वीजग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
....

कोल्हापूर जिल्ह्यातील १६ हजार ६१५ ग्राहक सहभागी

पुणे परिमंडलातील १ लाख २३ हजार ४०३ वीज ग्राहकांकडून १ कोटी ४८ लाख ८ हजार ३६० रुपयांची वार्षिक बचत झाली आहे. यामध्ये कोल्हापूर परिमंडलातील २७ हजार ७९ ग्राहक ३२ लाख ४९ हजार ४८० रुपयांची बचत करीत आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील १६ हजार ६१५ आणि सांगली जिल्ह्यातील १० हजार ४६४ ग्राहकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Skybus : हवेतून धावणाऱ्या बसची गडकरींकडून पाहणी, शारजातील कंपनीला भेट; वाहतूक कोंडी कमी करण्याचा पर्याय

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Pune-Kolad Road Accident : पुणे-कोलाड मार्गावर लवळे फाट्याजवळ भीषण अपघात; सिमेंटच्या ट्रकने कार-दुचाकींना उडवले, एकजण जागीच ठार, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT