कोल्हापूर

आजरा ः गव्याने चारचाकीवर उडी मारल्याने दोघेजण जखमी

CD

83702
आजरा ः गव्याने मोटारीवर मारलेल्या उडीमुळे मोटारीचे झालेले नुकसान. (छायाचित्र ः श्रीकांत देसाई, आजरा)
...
आजऱ्यात गव्याची मोटारीवर उडी
वन विभागाच्या कार्यालयाजवळची घटना ः दोघेजण जखमी
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १४ ः आजरा-गडहिंग्लज मार्गावर म्हसोबा देवस्थानजवळ गव्याने धावत्या मोटारीवर उडी मारल्याने गाडीतील दोघेजण जखमी झाले. युवराज मारुती देशमुख (वय ३८) व रत्नप्रभा प्रकाश कांबळे (वय २६) (दोघेही रा. बुरुडे, ता. आजरा) अशी जखमींची नावे आहेत. वन विभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी- युवराज देशमुख हे रत्नप्रभा कांबळे यांच्यासह सायंकाळी मोटारीतून गडहिंग्लजकडे चालले होते. त्यांची मोटार म्हसोबा देवालयाजवळ आल्यावर रस्ता ओलांडणारा गवा बुजला. त्याने मोटारीवर उडी मारली. अचानक घडलेल्या प्रकाराने देशमुख घाबरले. हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही. त्यांनी प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. दरम्यान, गवा गाडीला धडकून रस्त्यावर कोसळला. जखमी अवस्थेत त्याने रस्त्याच्या बाजूने जंगलात धूम ठोकली. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी गाड्या थांबवून जखमींना गाडीच्या बाहेर काढले. युवराज यांना काचेचे तुकडे लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी आजऱ्यातील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यावेळी घटनास्थळी वाहनधारकांची मोठी गर्दी जमली होती. वनपाल बाळेश न्हावी व वनरक्षक प्रियांका पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
...
राधानगरीतील घटना ताजी
सोमवारी (ता. १३) राधानगरीजवळ गव्याने उडी मारल्याने तिघे जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच आजऱ्याजवळही अशीच घटना घडली. याची चर्चा घटनास्थळी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT