कोल्हापूर

इचल : पंचगंगा गाळ काढण्यास गती

CD

पंचगंगेतील गाळ काढण्यासाठी
नऊ लाखांचे अंदाजपत्रक तयार

इचलकरंजी महापालिका करणार जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर

इचलकरंजी, ता. १४ : येथील पंचगंगा नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामास गती आली आहे. याबाबतच्या कामाचे महापालिका प्रशासनाकडून नऊ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. हे अंदाजपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
येथील पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे घाट परिसरात नदीपात्र उथळ बनले आहे. पावसाळ्यात नदीपात्रातील पाणी बाहेर पडून पूर परिस्थिती निर्माण होते. तर उन्हाळ्यात हा परिसर कोरडा पडतो. त्यामुळे या नदीपात्रातील गाळ काढण्याची परवानगी शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी केली होती. त्यानुसार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. याबाबतची बैठक अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत झाली होती.
यानंतर गाळ काढण्याच्या कामाला गती आली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गाळ काढण्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सुमारे नऊ लाख रुपये खर्चाचे हे अंदाजपत्रक आहे. उद्या (बुधवार) याबाबतची बैठक पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. त्यावर या अंदाजपत्रकावर चर्चा करून पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. गाळ काढण्यासाठी येणारा हा खर्च कोणत्या माध्यमातून करायचा, यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmers Protest: कोकणातील शेतकरी मुंबईत आक्रमक! बडे नेते आणि आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु; काय आहे मागणी?

Election Fraud: मतदानानंतर उघड झाला मोठा खेळ! ‘या’ राज्याच्या निवडणुकीत अवैध मतदान; १० विदेशी नागरिकांसह चार महिला अटकेत

High Court : ती मशीद नाही तर देवी सरस्वतीला समर्पित मंदिर ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निकाल

हार्दिक श्रेयस विसरा! रवी शास्त्रींनी टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी सुचवलं 'हे' नाव म्हणाला मला...

Suvendu Adhikari: बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिला; कोणती जागा सोडली? राजीनाम्यानंतर भावूक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT