कोल्हापूर

पोलिसवृत्त

CD

हुपरीत तरुणावर
खुनी हल्ला

कोल्हापूर ः हुपरी येथे सुरू असलेल्या मिरवणुकीतून बाजूला नेऊन ओंकार प्रकाश शिंदे (वय १६, रा. होळकरनगर, हुपरी) याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. धारदार शस्त्राने डोक्यात वार झाल्याने ओंकार गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
.....
अपघातात
वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर ः चिखली फाट्यानजीक झालेल्या रिक्षा अपघातात बाळाराम दत्तू कुंभार (वय ६८, रा. शिराळा) यांचा मृत्यू झाला. बुधवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमीला गंभीर अवस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले होते; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.
.............
बोरिवडेत
दोघांना मारहाण

कोल्हापूर ः बोरिवडे (ता. पन्हाळा) येथे झालेल्या मारहाणीत कुलदीप रंगराव शिंदे (वय २८) व रंगराव गोविंद शिंदे (५५) जखमी झाले. मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमी अवस्थेत दोघांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
..............
कणेरीत
एकास मारहाण

कोल्हापूर ः कणेरी येथे जागेच्या वादातून जनार्दन मारुती शिंदे (वय ६२, रा. सोनतळी) यांना मारहाण झाली. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
.............

कळंब्यातून
लॅपटॉपची चोरी

कोल्हापूर : कळंबा येथील प्रथमेशनगर परिसरातून चोरट्याने अथर्व गणेश चव्हाण (वय २०, सध्या रा. प्रथमेशनगर, कळंबा, मूळ रा. कात्रज, पुणे) याच्या खोलीतील लॅपटॉप चोरून नेला. हा प्रकार शनिवारी (ता. ११) मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास घडला. याबाबत अथर्वने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
.......................

पूर्ववैमनस्यातून
बापलेकास मारहाण

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून हसूर दुमाला (ता. करवीर) येथील शांताराम महादेव पाटील (वय ५०) आणि सिद्धेश पाटील यांना मारहाण करण्यात आली. झटापटीत ब्लेडने वार करण्यात आल्याने दोघे जखमी झाले. मंगळवारी (ता. १४) दुपारी पाटील यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी रोहित जयसिंग पाटील-कोल्हे (रा. यवलूज, ता. पन्हाळा) याच्यासह तीन अनोळखींवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शांताराम पाटील यांनी पूर्वीच्या वादाबद्दल फोनवरून रोहितकडे विचारणा केली. या रागातून रोहितने मित्रांसोबत पाटील यांच्या घरासमोर येऊन भांडण केले. यात ब्लेडने पाटील यांच्या नाकावर, तोंडावर वार केले. तसेच त्यांचा मुलगा सिद्धेशला चौघांनी काठीने बेदम मारहाण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT