कोल्हापूर

इचलकरंजी महापालिकेला पोलिस बंदोबस्ताची प्रतीक्षा

CD

इचलकरंजी महापालिकेला
पोलिस बंदोबस्ताची प्रतीक्षा

फेरीवाला अतिक्रमण मोहीम रखडली
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १५ : शहरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात महापालिका धडक मोहीम राबवणार आहे. पण, त्यासाठी अद्याप आवश्यक पोलिस बंदोबस्त मिळालेला नाही. त्यामुळे तूर्तास ही मोहीम रखडली आहे. महापालिका प्रशासनाने पोलिस प्रशासनाकडे पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. पण, त्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
शहरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्य मार्ग तर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे झाकोळला गेला आहे. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करीत अनेकवेळा मार्ग काढावा लागतो. याबाबत महापालिकेकडे तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात फेरीवाल्यांचे अतिक्रमण दूर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यासाठी प्रशासनाकडून पोलिस विभागाकडे बंदोबस्त मागवला होता. त्यामुळे दोन दिवसांत फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम राबविण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली होती. मात्र, अद्याप पोलिस बंदोबस्त मिळाला नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून दिली. त्यामुळे तूर्त ही मोहीम रखडल्यात जमा आहे.
----------
सुरक्षारक्षक कशासाठी?
महापालिकेने १६ सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या वेतनावर लाखो रुपये खर्ची पडतात. पोलिसांप्रमाणेच त्यांना अधिकार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन मोहिमेवेळी त्यांचा वापर करता येणे शक्य आहे. त्याबाबत महापालिका प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT