कोल्हापूर

पाटील इलेव्हन, गिरीश इलेव्हनचे वर्चस्व

CD

83882
कोल्हापूर ः छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या शिवशाहू ४० वर्षांवरील वेट्रन फुटबॉल स्पर्धेत गिरीश शहा इलेव्हन विरुद्ध जनार्दन सूर्यवंशी इलेव्हन संघांमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यातील एक क्षण. (मोहन मेस्त्री ः सकाळ छायाचित्र सेवा)
.............
पाटील इलेव्हन, गिरीश इलेव्हन विजयी

शिवशाहू ४० वर्षांवरील वेट्रन फुटबॉल स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः शिवशाहू ४० वर्षांवरील वेट्रन फुटबॉल स्पर्धेत उदय पाटील इलेव्हनने के.एस.व्ही इलेव्हनचा, तर गिरीश शहा इलेव्हनने जनार्दन सूर्यवंशी इलेव्हनचा पराभव केला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर आज उदय पाटील इलेव्हन विरुद्ध के.एस.व्ही इलेव्हन यांच्या सामना झाला. त्यात उदय इलेव्हनने के. एस. व्ही. इलेव्हनचा तीन विरुद्ध शून्य गोलने पराभव केला. यात नीलेश काळे, रिची फर्नाडिस आणि सुनील मुळीक यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद केली. एकतर्फी झालेल्या या सामन्यात पाटील इलेव्हनच्या वेगवान चढायांपुढे के.एस.व्ही.च्या खेळाडूंचा टिकाव लागला नाही.
दुसरा सामना गिरीश शहा इलेव्हन विरुद्ध जनार्दन सूर्यवंशी इलेव्हन यांच्यात झाला. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात दोन्ही संघांनी वेगवान चढाया केल्या. दोन्ही संघांना पूर्वार्धात एकही गोल करता आला नाही. त्यामुळे फलक गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात दोन्ही संघांनी शार्टपासिंगचा अवलंब करीत गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, दोन्ही बाजूंची बचावफळी सजग असल्याने एकही गोल नोंदविता आला नाही. अखेरीस मुख्य पंच किरण साळोखे यांनी टायब्रेकरचा अवलंब केला. त्यात शहा इलेव्हनकडून सचिन पाटील, मिलिंद शिंदे, कुमार पचिंद्रे यांनी अचूक गोल नोंदविले, तर सूर्यवंशी इलेव्हनकडून संदीप पाटीलने एकमेव गोल नोंदविला. त्यामुळे हा सामना शहा इलेव्हनने तीन विरुद्ध एक गोलने जिंकला.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT