कोल्हापूर

इचल : टुडे पान २ मेन

CD

ich151.jpg 83869
कोल्हापूर ः सुळकूड पाणी योजनेबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी माजी खासदार राजू शेट्टी यांनी चर्चा केली.

सुळकूड योजनेचा अहवाल
२५ मेपर्यंतसादर करणार

येडगे; राजू शेट्टी यांनी केली चर्चा

इचलकरंजी, ता.१५ ः सुळकूड योजनेतून इचलकरंजी शहराला शुद्ध व मुबलक पाणी देणे शक्य आहे किंवा नाही, याबाबतचा अहवाल येत्या २५ मेपर्यंत शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात बैठक घेऊन १ महिन्यात पाणी प्रश्न निकालात काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्याला अडीच महिने झाल्यानंतरही याबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्याने आज माजी खासदार शेट्टी यांनी याप्रश्नी जिल्हाधिकारी येडगे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
इचलकरंजी शहराला शुध्द व मुबलक पाणी मिळावे, यासाठी सुळकूड योजनेतून पाणीसाठा उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्याच्या दबावाखाली पुन्हा अहवाल मागणीचे कारण पुढे करीत पाण्याचा प्रश्न लांबणीवर टाकला आहे. महिन्याभरात यावर निर्णय घेण्याचे त्यांनी जाहीर केले होते. आचारसंहितेचा अडसर येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र अडीच महिने झाले तरीही कार्यवाही झालेली नाही. इचलकरंजी शहराला सुळकूड योजनेतून पाणी देता येत असल्याचे प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यातच शासनास अहवाल सादर केलेला आहे. या अहवालानंतर विधानभवनात झालेल्या बैठकीत पुन्हा अहवाल मागणी करण्याची आवश्यकता नव्हती, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, निवडणुकीच्या कामकाजाचे कारण देत कोणतेच अधिकारी जागेवर नसल्याने अहवाल देण्यास विलंब झाल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले. २५ मे पर्यंत शासनास अहवाल सादर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT