कोल्हापूर

गड- गोडसाखर कारखाना

CD

''गोडसाखर'' पुन्हा भाडेतत्त्‍वाच्या वाटेवर
संचालकांची शनिवारी बैठक : गडहिंग्लजमध्ये अचानक आलेल्या विषयाने आश्चर्य

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १५ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना (गोडसाखर) पुन्हा एकदा चालवायला देण्याचे संकेत आहेत. शनिवारी (ता. १८) बोलविलेल्या संचालक मंडळ बैठकीच्या नोटिसीत या विषयावर चर्चा होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने ७५ कोटींचे आर्थिक पाठबळ देऊनही अचानक कारखाना चालवायला देण्याचा विषय पुढे आल्याने तालुक्यात आश्चर्य व्यक्त होत आहे.
कारखाना आर्थिक अडचणीत आल्याने २०१३ पासून ब्रिस्क कंपनीकडे भाडेतत्त्‍वाने चालविण्यासाठी दिला. दहा वर्षांची मुदत असताना आठ हंगाम पूर्ण करून कंपनीने कारखाना सोडला. त्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाने २०२१-२२ चा हंगाम सुरू करण्यास अर्थसहाय्‍य उपलब्धतेसाठी सुरू केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. अखेर तत्कालीन अध्यक्ष कै. श्रीपतराव शिंदे व त्यांच्या समर्थक संचालकांनी तालुक्यातून विविध संस्था व वैयक्तिक ठेव गोळा करून कारखाना स्वबळावर सुरूही केला. दरम्यान, अंतर्गत वादामुळे १२ संचालकांनी राजीनामा दिल्याने संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त झाले. यामुळे कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती झाली.
दरम्यान, प्रशासकांनी कारखाना चालविण्यास देण्याची दोनवेळा निविदा प्रसिद्ध केली. परंतु, त्यासाठी कोणतीच कंपनी पुढे आली नाही. त्यानंतर झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत सत्तांतर झाले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने सत्ता मिळविली. डॉ. प्रकाश शहापूरकर अध्यक्ष झाले. मुश्रीफ यांनी केडीसीसीच्या माध्यमातून कारखान्याला पहिल्या टप्प्यात ५५ कोटींचे अर्थसहाय्‍य दिले. मशिनरी दुरुस्तीसाठी मोठा अवधी लागल्याने कारखान्याचा २०२३-२४ चा हंगाम उशिरा का होईना स्वबळावर सुरू झाला. यामुळे निवडणुकीत स्वबळावर कारखाना चालविण्याचे सभासदांना दिलेले आश्वासन पूर्ण झाले. हंगामाच्या अंतिम टप्प्यात उत्पादकांसह तोडणी-ओढणीची बिले देण्यासाठीही केडीसीने २० कोटींचे अर्थसहाय्य दिले. त्यानंतर अध्यक्ष डॉ. शहापूरकर यांनी एका ट्रस्टकडून ३०० कोटींचे अर्थसहाय्य घेण्याचा विषय संचालकांच्या बैठकीत आणला. त्याला एकमताने मंजुरीही मिळाली. दरम्यान, स्वबळासाठी केडीसीसीने मोठे अर्थसहाय्याचे पाठबळ देऊनही आता पुन्हा कारखाना चालवायला देण्याच्या विषयावर सभासद व उत्पादकांत जोरात चर्चा सुरू झाली आहे.

चौकट...
* बैठकीसमोर दोनच विषय
शनिवारी (ता. १८) दुपारी तीन वाजता कारखाना सभागृहात होणाऱ्या संचालक मंडळाच्‍या बैठकीसमोर दोन विषयांची नोटीस सचिवांच्या सहीने काढली आहे. कारखाना चालवण्यास देणे व अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या ऐनवेळच्या विषयावर चर्चा करणे असे दोनच विषय आहेत. यातील कारखाना चालवण्यास देण्याचाच मुद्दा प्रामुख्याने चर्चेला येणार आहे. त्यावर कोणता निर्णय होणार, याकडे आता तालुक्यातील ऊस उत्पादकांचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्रला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

MS Dhoni ला बसला स्पीडचा फटका, अतिघाईमुळे द्यावा लागणार 'इतक्या' रुपयांचा दंड; काय आहे प्रकरण ?

Mumbai-Goa Highway Accident : होळीच्या सणावर विरजण! 18 वर्षाच्या बहिणीचा भावासमोरच दुर्दैवी अंत; खारेपाटणमधील शेट्ये कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT