कोल्हापूर

विद्यापीठात मिळणार आर्टिफिशल इंटिलिजन्स, मशिन लर्निंगचे शिक्षण

CD

लोगो ः शिवाजी विद्यापीठ

एआय, मशीन लर्निंग अभ्यासक्रमांना मान्यता
विद्यापीठ विद्या परिषद बैठक ः ‘खेलो इंडिया’च्या खेळाडूंना विमानप्रवास करता येणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः शिवाजी विद्यापीठात आता आर्टिफिशल इंटिलिजन्स, मशीन लर्निंग, अप्लाईड आर्ट अँड पेंटिंग अभ्यासक्रमांचे शिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या अभ्यासक्रमांना आज विद्या आणि व्यवस्थापन परिषद या अधिकार मंडळांनी मान्यता दिली. खेलो इंडिया स्पर्धेला जाण्यासाठी खेळाडूंना अपवादात्मक स्थितीत कुलगुरूंच्या मान्यतेने विमानप्रवास करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर सचिवपदी कुलगुरू डॉ. व्ही. एन. शिंदे आणि प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील प्रमुख उपस्थित होते. बीएस्सी., एमएस्सी आर्टिफिशल इंटिलिजन्स अँड मशीन लर्निंग, आंतरविद्याशाखीय बीएफए अप्लाईड आर्ट अँड पेंटिंग अभ्यासक्रमांना आणि बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. अभ्यासक्रमांना नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्या परिषदेने मान्यता दिली. उंब्रजमधील मंगलताई रामचंद्र जगताप महिला महाविद्यालय आणि कडेगाव येथील मातोश्री बयाबाई कन्या महाविद्यालयाला को-एज्युकेशनला मान्यता दिली. ई-कंटेट ऑनलाईन अभ्यासक्रम आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक ऑडिट करण्यास मान्यता दिली. विद्यापीठ कार्यक्षेत्रात असलेल्या विविध पाच महाविद्यालयांमधील बी. व्होक बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रम बंद करण्याबाबत चर्चा झाली. कला, वाणिज्य, विज्ञान पदवी प्रथम आणि द्वितीय वर्ष अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचा गुणवत्ता पडताळणी अहवाल स्वीकारण्यात आला. दरम्यान, व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विविध ३८ विषयांवर चर्चा झाली. मुद्रणालय विभागाचा विद्याविषयक समितीचा अहवाल स्वीकारण्यात आला. भांडारपाल पदाची कार्यपद्धती निश्चित करण्याचा निर्णय झाला. केआयटीज् आयएमईआरला स्वायत्त दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

चौकट
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला तात्पुरती जागा
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बॅचमिक्स काँक्रिट प्लँटसाठी विद्यापीठातील पाच गुंठे जागा तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेत मान्य करण्यात आला. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे तिसरे राज्यस्तरीय अक्षर संमेलन २४ ते २६ मे दरम्यान आयोजित करण्यास आणि नाट्य शिबिर घेण्यास मान्यता दिली. भारतीय वायूसेना आणि विद्यापीठात सामंजस्य करार करण्यास मान्यता दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT