कोल्हापूर

गोविंदराव टेंबे रंगमंदिर लोकार्पण सोहळा

CD

फोटो
83928, 28699,

गोविंदराव टेंबे रंगमंदिर लोकार्पण सोहळा शनिवारी
व्ही. बी. पाटील, डॉ. अश्विनी भिडे यांची माहिती; माणिक भिडे स्मृती संगीत महोत्सवही रंगणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः नाट्यसंगीतातील पहिल्या ख्याली गायन, पहिल्या मराठी बोलपटाचे नायक, संगीत दिग्दर्शक, मराठी स्वरनाट्याचे पहिले प्रवर्तक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गोविंदराव टेंबे यांच्या स्मृती आता रंगमंदिराच्या रूपाने जपल्या जाणार आहेत. येथील गायन समाज देवल क्लबने हे रंगमंदिर उभारले असून, त्याचा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. १८) होणार आहे. यानिमित्ताने दोन दिवशीच माणिक भिडे स्मृती संगीत महोत्सव रंगणार असल्याची माहिती देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, प्रसिद्ध गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. पाटील म्हणाले, ‘चार कोटींहून अधिक खर्च करून आता देवल क्लबमध्ये रंगमंदिरासह विविध कामे पूर्ण झाली आहेत. रंगमंदिर वातानुकूलित आणि अद्ययावत सामग्रीने सज्ज असून रसिक, कलासक्त व्यक्तींसह संस्थांच्या मदतीने ही कामे पूर्ण झाली. शनिवारी (ता. १८) सायंकाळी पाच वाजता उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत रंगमंदिराचा लोकार्पण सोहळा होईल.’
डॉ. भिडे म्हणाल्या, ‘माणिक भिडे या मूळच्या कोल्हापूरच्या. जयपूर अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका म्हणून त्यांची जगभरात ओळख आहे. त्यांच्यानंतर त्यांची शिष्य परंपराही मोठी आहे. त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी दोन दिवस सांगीतिक मैफली होणार आहेत. यानिमित्ताने राज्यभरातून शिष्य मंडळी एकवटणार आहेत. मैफलीच्या विनामूल्य प्रवेशिका देवल क्लबमध्ये उपलब्ध आहेत.’
दरम्यान, पत्रकार परिषदेला राजेंद्र पित्रे, सचिन पुरोहित, राजेंद्र देशपांडे, श्रीकांत डिग्रजकर, केशव तिरोडकर आदी उपस्थित होते.

ठळक चौकट
असा होईल महोत्सव...
० शनिवारी (ता. १८) ः सायंकाळी सहा वाजता
० पहिले सत्र ः माणिक भिडे यांच्या शिष्यवर्गाचे शास्त्रीय गायन (सहभाग ः डॉ. निषाद मटंगे, सोनल शिवकुमार. साथ ः प्रणव गुरव, ज्ञानेश्वर सोनवणे)
० दुसरे सत्र ः माणिक भिडे यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंगावर आधारित ‘रूप पाहता लोचनी’ कार्यक्रम. (सहभाग ः डॉ. रेवती कामत, शमिका भिडे, ऋती अभ्यंकर, स्वराली जोशी, प्रज्ञा देव, ऐश्वर्या कडेकर. साथ ः भरत कामत, अमेय बिचू, प्रसाद जोशी, आदित्य आपटे, श्रेयस बडवे).
...........
० रविवारी (ता. १९) ः सकाळी नऊ वाजता
० पहिले सत्र ः माणिक भिडे व अश्विनी भिडे यांच्या शिष्यांचे शास्त्रीय गायन (सहभाग ः प्रीती तळवलकर, ऋतुजा लाड, धनश्री घैसास, जसरंगी जुगलबंदी ः स्वरांगी मराठे, निमिष कैकाडी. साथ ः प्रणव गुरव, ज्ञानेश्वर सोनावणे, अमेय बिचू, सिद्धार्थ पडियार)
० दुसरे सत्र ः डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांचे शास्त्रीय गायन (साथ ः भरत कामत, अमेय बिचू)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Navi Mumbai News: नवी मुंबईत ७० हजार वाहनांचा चक्का जाम, नागरिकांसह आयात निर्यातदारांना मोठा फटका

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुक्ताई पालखीचे दर्शन घेत स्वागत केले

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT