कोल्हापूर

विद्यार्थीनीचा बुडून मृत्यू

CD

chd156.jpg फिवोना जमूला 83932
-----------------
सुळग्यातील विद्यार्थीनीचा
हजगोळी जलाशयात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १५ ः हजगोळी (ता. चंदगड) येथील तिलारी धरणाच्या बॅक वॉटर जलाशयात वडिलांसह पोहण्याचा आनंद घेणाऱ्या विद्यार्थीनीचा बुडून मृत्यू झाला. फिवोना सलोमन जमूला (वय ११, रा. आंबेडकर गल्ली , सुळगा, जि. बेळगाव) असे तिचे नाव आहे. वडिल सलोमन जमूला यांना वाचवण्यात यश आले. यासंदर्भात मिळालेली माहिती अशी ः उन्हाळी सुटी असल्याने सलोमन जमूला आपली मुलगी फिवोना हिला घेऊन हजगोळी येथील चाळोबा देवालयाकडे आले होते. तेथील तिलारी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्याचा आनंद घेत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. दोघांनाही पोहता येत नव्हते. बुडू लागल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. बाजूला असलेल्या नागरिकांनी सलोमन यांना तातडीने बाहेर काढले. मात्र, जमूलाला बाहेर काढेपर्यंत मोठा कालावधी लागला. त्यात तिचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT