कोल्हापूर

धोकादायक इमारतींबाबत महापालिका अलर्ट

CD

लोगो इचलकरंजी महापालिका

धोकादायक इमारतींबाबत महापालिका अलर्ट
अतिवृष्टीमुळे होणारी दुर्घटना टाळा; खबरदारी घेण्याचे मिळकतधारकांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १६ ः आगामी पावसाळ्यात महापूर व अतिवृष्टीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा अलर्ट झाली आहे. अतिवृष्टीमुळे जुन्या इमारतींना धोका पोहचू शकतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा धोकादायक इमारतींबाबत संबंधित मिळकतधारकांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने केल्या आहेत.
उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असून, मॉन्सूनपूर्व तयारीसाठी आतापासून महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. यंदा पावसाची सरासरी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्याची धास्ती घेतली आहे. अतिवृष्टीचा धोका यंदा जास्त आहे. त्यामुळे जीर्ण इमारती धोकादायक ठरू शकतात. नुकत्याच झालेल्या वादळी पावसात गावभाग परिसरात एका घराची भिंत कोसळली होती. त्यामुळे अशा इमारतींबाबत सर्वेक्षण करून ठोस कार्यवाही करावी लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने मिळकतधारकांना आवाहन केले आहे. त्यामध्ये इमारतीचा काही भाग अथवा पूर्ण भाग पडण्याचा धोका असल्यास तो स्वतःहून उतरून घ्यावा, अथवा त्याचे मजबुतीकरण करावे, असे आवाहन केले आहे. त्यासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी संबंधित मिळकतधारकांवर टाकली आहे. उपाययोजना न केल्यामुळे दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित मिळकतधारकांवर असणार आहे. यामध्ये महापालिकेचा कोणताही संबंध असणार नसल्याचे जाहीर केले आहे.

चौकट
गावभाग परिसरावर लक्ष
शहरात २०२१ मध्ये अतिवृष्टी होऊन पंचगंगा नदीला महापूर आला होता. या महापुराच्या विळख्यात गावभाग परिसर सापडला होता. त्यामुळे या परिसरातील जुन्या इमारती कमकुवत होण्याची शक्यता आहे. यावर्षीही महापुराची शक्यता गृहीत धरून वित्त व जीवितहानी होऊ नये, यादृष्टीने धोकादायक इमारतींबाबत आवश्यक ती ठोस कार्यवाही करावी, अशी सूचना महापालिका प्रशासनाकडून केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gokul Election : 'गोकुळ'मध्ये अरुण नरके गट महायुतीसोबत! शाहूवाडीतील सरुडकर गटही वाटेवर, आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का?

Ram Shinde : विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार : राम शिंदे

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात कोर्ट आज निर्णय देणार

'मी विरार फास्ट लोकलमधून उडी मारलेली...' अभिनेत्री मुग्धा शाह यांनी सांगितला आयुष्यातील धक्कादायक प्रसंग, म्हणाल्या...

Satara Rain Update : साताऱ्यासह विविध भागांत दमदार पाऊस; रस्‍ते जलमय; उत्तर खटाव परिसरात नदी, नाले प्रवाहित, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

SCROLL FOR NEXT