कोल्हापूर

शरद इन्स्टिट्यूटच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

CD

शरद इन्स्टिट्यूटच्या आठ विद्यार्थ्यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. १६ ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल विभागातील आठ विद्यार्थ्यांची एक्साइड इंडस्ट्रीज लि., या नामांकित कंपनीत निवड झाली.
लेक्ट्रिकलमधील विनोद पाटील, विश्वजित यादव, रोहन जाधव, वैभव म्हातुगडे, विशाल उगरे, मेकॅनिकलच्या रोहन मगदूम, अक्षय मदने, आशिष कोळी यांना संधी मिळाली.
एक्साइड जगातील सर्वात विस्तृत श्रेणीतील लीड ॲसिड स्टोरेज बॅटरीजचे डिझाईन, उत्पादन, मार्केटिंग आणि विक्री करते. ज्यामुळे ॲप्लिकेशन्सच्या विस्तृत स्पेक्ट्रमचा समावेश होतो. पाच खंडांमध्ये पसरलेल्या ४६ राष्ट्रांमध्ये कंपनी काम करते. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कौशल्य अवगत होण्यासाठी इनोव्हेशन सेंटरअंतर्गत दिलेल्या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना फायदा झाला. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्निकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यू यासह टेक्निकल सेशन, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसीपिक ट्रेनिंग, अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबवले जातात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, आमदार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. प्रा. नेहा सोनी, प्रा. अभिजित केकरे आदींचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT