कोल्हापूर

सीमाभागातील दोनशे विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठाला पसंती

CD

लोगो ः शिवाजी विद्यापीठ
फोटो 84062
........
सीमाभागातील २०० विद्यार्थ्यांची विद्यापीठाला पसंती
उच्च शिक्षण घेण्याची तयारी; अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विशेष सवलत योजना

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : सांगली, बेळगाव सीमाभागातील २०० विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शिवाजी विद्यापीठाला पसंती दर्शविली आहे. त्यांनी विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्याची तयारी केली आहे. स्थापनेपासूनच दक्षिण महाराष्ट्रासह सीमावर्ती उत्तर कर्नाटकातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास विद्यापीठाच्या विशेष समितीने सीमावासीयांना दिला.
विद्यापीठाने कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्या संकल्पनेतून दोन वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत योजना सुरू केली. त्याची माहिती सीमाभागातील नागरिकांना देण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीने यंदा ९ ते १४ मे दरम्यान सीमाभागातील निपाणी येथील देवचंद महाविद्यालय, भालकी येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय, खानापूर येथील शिवस्मारक आणि बेळगाव येथील संत तुकाराम सांस्कृतिक सभागृहात विशेष कार्यशाळा घेतली. त्यामध्ये डॉ. प्रकाश पवार, जगन कराडे, उदय पाटील, संतोष सुतार, कविता वड्राळे, नवनाथ वळेकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळांतून सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याबाबत पसंती दर्शविली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी कार्यशाळा योजनेच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.
.........
चौकट
दोन वर्षांत १३२ विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ
सीमाभागातील ८६५ गावांतील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने शैक्षणिक प्रवेशाबाबत विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत अनुदानित अभ्यासक्रमांमध्ये १० टक्के राखीव जागा असून, या जागांमधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ आहे. विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्कात २५ टक्के सवलत, मोफत वसतिगृह सुविधा दिली जाते. पहिल्या वर्षी ४४, तर गेल्या वर्षी ८८ अशा एकूण १३२ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
.......
चौकट
सीमावासीयांची अशी भावना...
विद्यापीठासह कोल्हापूरवासीय नागरिक नेहमीच सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. विद्यापीठाच्या या योजनेमुळे विद्यार्थी व पालकांची होणारी शैक्षणिक कुचंबणा थांबेल. त्यांना उच्चशिक्षणाच्या आणि करिअरच्या विविध संधी प्राप्त होतील, अशी भावना कार्यशाळांना उपस्थित नागरिकांनी समिती सदस्यांशी बोलताना व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT