कोल्हापूर

टायपिंग, सागर घाटगे सत्कार

CD

84151
कोल्हापूर : राज्य टायपिंग संघटनेवर कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधीपदी निवड झाल्याबद्दल सागर घाटगे यांचा सत्कार करताना महेश जाधव. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

राज्य संघटनेवर ‘संघटनकौशल्या’ला संधी
महेश जाधव : टायपिंग संघाच्या स्नेहमेळाव्यात घाटगे यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : सभासदांना संघटित करण्याचे, त्‍यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे कौशल्यगुण सागर घाटगे यांच्यात असल्याने त्यांना राज्यपातळीवर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे, या संधीचा वापर ते टायपिंग संघटनेच्या कामासाठी निश्‍चितपणे करतील, असा विश्‍वास भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश जाधव यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा टायपिंग संघटनेचा स्नेहमेळावा नुकताच झाला. यामध्ये महाराष्ट्र राज्य टायपिंग संघटनेवर कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर बिनविरोध निवड झालेले सागर ऊर्फ सचिन बापू घाटगे यांचा शाल, श्रीफळ व श्री अंबाबाई देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. ‍याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जाधव बोलत होते.
यावेळी विश्‍व हिंदू परिषदेचे महामंत्री श्रीकांत पोतणीस यांनी नव्या नेतृत्वाला संधी दिल्याबद्दल जिल्ह्यातील टायपिंग प्रशिक्षण संस्था चालकांचे कौतुक केले. यावेळी संघटनेच्या माजी राज्य प्रतिनिधी अभिलाषा नाईक यांचाही विशेष सत्कार केला. टायपिंग प्रशिक्षण संस्थेच्या चालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही सागर घाटगे यांनी दिली. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, अभिलाषा नाईक, अनिल गावंडे, सचिन भोईटे, कौशल्य विकास अधिकारी निवास कोळी यांचीही भाषणे झाली. यावेळी जिल्हा टायपिंग संघटनेच्या अध्यक्ष पदाची सूत्रे रोहन हावळ यांच्याकडे सोपवत असल्याची घोषणाही करण्यात आली. यावेळी टायपिंग संघटनेचे संचालक प्रकाश चव्हाण, सुरेंद्र मोरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व टायपिंग प्रशिक्षण संस्थाचालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT