कोल्हापूर

वळीव पावसाची पडझड

CD

वादळी वाऱ्याने कोट्यवधींचे नुकसान
दोन आठवड्यातील जिल्ह्यातील चित्रः सर्वाधिक नुकसान चंदगड तालुक्यात, शाहूवाडी तालुक्यालाही फटका
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार वळीव पावसाने जिल्ह्यातील खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक कोटी पाच लाख ४७ हजार रुपयांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. चंदगड तालुक्यात सर्वाधिक ५७ लाख ८९ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्याला कमी फटका बसला आहे. तरीही, गेल्या आठवडा - दोन आठवड्यांत झालेल्या वळीव पावसात अनेक ठिकाणी घरांच्या छतावरील पत्रे उडाले, भिंतींची पडझड, शाळांचे, स्मशानशेडचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. पावसासह जोरदार येणाऱ्या वाऱ्याचा फटका या सर्वच मालमत्तांना बसत असल्याचे चित्र आहे. यावर्षी वाऱ्याची तीव्रता सर्वाधिक दिसून येत आहे. वळीव पावसामुळे लोकांना दिलासा मिळत असला तरीही वादळामुळे होणारे नुकसान मात्र दु:ख देत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात वळीव पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची दररोज माहिती घेतली जात आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासह इतर सर्व शासकीय कार्यालयांकडून पावसाची माहिती संकलित केली जात आहे.
जिल्ह्यात सोमवारीही वाऱ्याचा वेग धडकी भरवणारा होता. यामध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे. याची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत सर्वाधिक नुकसान हे चंदगड तालुक्यात झाले आहे. त्यानंतर शाहूवाडी तालुक्याचा क्रमांक लागतो. या दोन्ही तालुक्यांत पावसापेक्षा जोरदार वाऱ्याचा फटका बसला आहे.
...

भिंत पडझड, पत्रे उडून जाण्यासह झालेले तालुकानिहाय नुकसान

तालुका* गाव* नुकसान झालेली अंदाजे रक्कम
हातकणंगले* अतिग्रे, मौजे सावर्डे* २ लाख ९० हजार रुपये
शिरोळ* उदगाव* ४ लाख ४५ हजार रुपये
पन्हाळा* काटेभोगाव, करंजफेण, वारनूळ, देसाईवाडी* ६ लाख ८ हजार रुपये
शाहूवाडी* पिशवी, करंजोशी, नांदारी* १० लाख ५४ हजार रुपये
राधानगरी* टिटवे* २५ हजार रुपये
करवीर* मुडशिंगी, महे, बाचणी, नंदवाळ* ४ लाख ४८ हजार रुपये
कागल* सिद्धनेर्ली, नानीबाई चिखली, कसबा सांगाव* ५ लाख ७० हजार रुपये
गडहिंग्लज* पालकर, मासेवाडी, तारेवाडी, दोनेवाडी, सांबरे, बसर्गे बुद्रक, कौलगे, चिंचेवाडी* ५ लाख १० हजार रुपये
भुदरगड* मौजे खेडगे, पेठ शिवापूर, तिरवडे, पिंपळगाव, दिंडेवाडी, वाघापूर, भाटिवडे* ६ लाख ४५ हजार रुपये
आजरा* पैशातवाडी* १ लाख ६२ हजार रुपये
चंदगड* तरळवाळ, तुर्केवाडी, मांडेदुर्ग, वैतकवाडी, कोवाड, कालकुंर्दी, कदणूर, कडलगे बुद्रक, रामपूर, तेऊरवाडी* ५७ लाख ८९ हजार ५०० रुपये
....

विजा चमकताना घराबाहेर पडू नका
‘जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस होत आहे. तसेच, विजाही चमकत आहेत. त्यामुळे विजा चमकत असताना लोकांनी घराबाहेर पडू नये’, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT