कनाननगरात महिलांसह
चौघांवर तलवार हल्ला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : पूर्ववैमनस्यातून कनाननगरातील महिलेच्या घरात घुसून तलवार, पाईपने मारहाण केल्याप्रकरणी पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये शोभा कांबळे जखमी झाल्या. त्यांच्या प्रापंचिक साहित्याचेही मोठे नुकसान करण्यात आले. याबाबत तानाजी श्रीपती कांबळे (वय ५८, रा. मराठा कॉलनी, पाचगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी तानाजी कांबळे व संशयित उमेश ऊर्फ गोट्या विटेकर यांच्यात वाद झाला होता. याचा राग मनात धरून रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संशयित उमेश ऊर्फ गोट्या विटेकर, निखिल कांबळे व अनोळखी तिघांनी शोभा कांबळे यांच्या घरात घुसून शोभा, त्यांची मुलगी ज्योती, आरती गोकुळ लांबा, पूनम संभाजी काळे यांना तलवार व लोखंडी पाईपने मारहाण केली. फिर्यादी तानाजी कांबळे हे भांडण सोडविण्यास गेल्यावर त्यांच्यावरही तलवारीने वार केले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.
...
माळी कॉलनीत घरफोडी
कोल्हापूर, ता. २१ : राजारामपुरी, माळी कॉलनीतील बंद घराचा कडीकोयंडा उचकटून दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. सोन्या-चांदीचे दागिने व देवाचे अलंकार चोरीस गेल्याची फिर्याद आशिष दिनकर लव्हटे (वय ३३) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, आशिष लव्हटे हे १८ मे रोजी कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण, सोन्याची दोन ग्रॅमची अंगठी, दीड ग्रॅमची अंगठी, दोन ग्रॅमच्या रिंगा, लहान बाळाच्या सोन्याच्या १५ अंगठ्या, चांदीचे पैंजण सहा जोड, गणपतीचे हार, फुले, मुकूट, किरीट, सुपारी, चांदीचे पान असा दीड ते पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.
...
मोटारचालकावर गुन्हा
कोल्हापूर : येथील वाशी नाका परिसरात भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाले. भाऊसाहेब बाबू पाटील (वय ४३) व तानाजी संतू कदम (वय ३५, रा. दोनवडे) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.