कोल्हापूर

पशुगणनेसाठी महापालिका कर्मचाऱ्यांची मागणी

CD

पशुगणनेसाठी महापालिका कर्मचाऱ्यांची मागणी
वीस जणांची घेणार मदत : जनावरांचे टॅगिंग करण्याचे आवाहन
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २१ : पशुसंवर्धन विभागाकडून पशुधन गणनेची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार विभागाकडून पशुधन गणनेसाठी इचलकरंजी महापालिका प्रशासनाकडे कर्मचाऱ्‍यांची मागणी केली आहे. नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (एनडीएलएम) अंतर्गत ‘भारत पशुधन’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोड) करून पशुधनाच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी २० प्रशिक्षित कर्मचाऱ्‍यांची मदत घेण्यात येणार आहे. पशुपालकांनी आपल्या जनावरांची नोंद टॅगिंग करून घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
पशुगणना दर पाच वर्षांनी केली जाते. यंदाच्या पशुगणनेच्या तयारीला पशुसंवर्धन विभाग लागला आहे. त्यानुसार प्राथमिक स्वरूपाची माहिती नोंद करण्याचे काम सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाकडून एक जूनपासून जनावरांच्‍या ईअर टॅगिंगची सक्ती केली आहे. ईअर टॅगिंग असल्यास शासनाच्या योजना व उपचारासाठी पात्र ठरणार आहेत. पशुधन गणनेसाठी पशुवैद्यकीय पदवी असलेल्या कर्मचाऱ्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच शहरी भागात चार हजार तर ग्रामीण भागामध्ये तीन हजार कुटुंबांसाठी एका कर्मचारी असणार आहे. इचलकरंजी शहरामधील पशुधन गणनेसाठी २० पशुवैद्यकीय कर्मचाऱ्‍यांची आवश्यकता असल्याने खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे.
------------------------------
२०१९ च्या नोंदणीनुसार पशूंची संख्या
नोंदीत जनावरे*इचलकरंजी*चंदूर*कबनूर*
गायी*१२२७*३७८*५५५*
म्हैस*१६९१*१००५*३८३*
शेळी*११८५*८८२*--*
एकूण*४१०३*२२६५*९३८*

---------------------------
शासनाने जनावरांच्या जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरणासाठी ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोड) सक्तीचे केले आहे. त्यामुळे पशुपालकांनी ईअर टॅगिंग करणे बंधनकारक आहे.
-डॉ. आर. बी. जंगम, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

Horoscope : जूनच्या सुरुवातीलाच बदलणार 'या' 3 राशींचे नशीब; नोकरी-धंद्यात मोठी कलाटणी, बनतोय धनलाभ योग

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

SCROLL FOR NEXT