आजरा तालुक्याचा बारावीचा निकाल ९७ टक्के
आजरा, ता. २१ ः आजरा तालुक्याचा बारावीचा निकाल ९७.११ टक्के लागला आहे. आज दुपारी निकाल जाहीर झाला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांची महाविद्यालय व संगणक केंद्रावर गर्दी झाली होती. निकाल कळाल्यावर अनेक विद्यार्थ्यांनी साखर-पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
बारावी परीक्षेला तालुक्यातून ८३२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ८०८ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. महिनाभर पालक व विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता व प्रतीक्षा लागली होती.
तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल असा ः आजरा कनिष्ठ महाविद्यालय - ९६.४५, आजरा कनिष्ठ महाविद्यालय व्होकेशनल विभाग - १००, उत्तूर ज्युनिअर कॉलेज - ९७.६७, बापूसाहेब सरदेसाई ज्युनिअर कॉलेज, निंगुडगे - ८६.६६, उर्दू ज्युनिअर कॉलेज आजरा - ८२.६०, व्यंकटराव ज्युनिअर कॉलेज आजरा - १००, ओम पॅरामेडिकल आजरा - १००, आर्टस्, सायन्स अण्ड कॉमर्स ज्युनिअर कॉलेज (पं. दीनदयाळ विद्यालय) आजरा - १००, नवकृष्ण व्हॅली उत्तूर - १०० टक्के.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.