कोल्हापूर

बारावीत पन्हाळा, गगनबावडा, राधानगरीची आघाडी

CD

बारावीत पन्हाळा, गगनबावडा, राधानगरीची आघाडी

मुलींची भरारी कायम; जिल्ह्यातील १०१ कॉलेजचा शंभर टक्के निकाल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : बारावी परीक्षेच्या निकालामध्ये यंदा कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत आघाडी घेतली आहे. करवीर, शाहूवाडी, गडहिंग्लजसह अन्य तालुके आणि कोल्हापूर शहरात मुलांच्या तुलनेत उत्तीर्णतेमध्ये मुलींनी भरारी घेतली आहे. जिल्ह्यातील विविध १०१ कॉलेज, तसेच आयटीआयचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ४९ हजार ४९३ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी ४९ हजार २१० जणांनी परीक्षा दिली. त्यातील ४७ हजार ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलांची संख्या २४ हजार ८००, तर मुलींची संख्या २२ हजार २७६ आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांच्या तुलनेत ३.८४ टक्क्यांनी अधिक आहे. पन्हाळा (९८.३३), गगनबावडा (९८.२८), राधानगरी (९८.२०) तालुका निकाल आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ गडहिंग्लज (९७.४५), शाहूवाडी (९७.३९), आजरा (९७.११), करवीर (९६.६७), चंदगड (९६.४७), भुदरगड (९६.२८), हातकणंगले (९५.६६), कोल्हापूर शहर (९४.५४), शिरोळ (९३.४१), कागल (९३.४०) आहे. एकूण नोंदणी केलेल्या १८८५ रिपीटर विद्यार्थ्यांपैकी १८७४ जणांनी परीक्षा दिली. त्यातील १३४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलांची संख्या ९२३ आणि मुलींची संख्या ४२१ इतकी आहे.
दरम्यान, शंभर टक्के निकाल लागलेल्या कॉलेजमध्ये विनायकराव हायस्कूल, आर्टस्, कॉमर्स ज्युनिअर कॉलेज, आजरा ज्युनिअर कॉलेज, ओम पॅरामेडिकल कॉलेज (आजरा), नव कृष्णा व्हॅली (उत्तूर), श्री. आनंदराव आबिटकर ज्युनिअर कॉलेज, विद्यावर्धिनी हायर सेकंडरी स्कूल, इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (गारगोटी), श्री परशराम पाटील प्रायव्हेट आयटीआय, वत्सलाबाई पाटील गर्ल्स ज्युनिअर कॉलेज, गुरुवर्य तुपारे ज्युनिअर कॉलेज कार्वे, श्री. शिवशक्ती ज्युनिअर कॉलेज अडकूर, श्री. शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणगाव, श्री. रवळनाथ माध्यमिक विद्यालय चंदगड, सह्याद्री विद्यालय हेरे, न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज नूल, हिडदुग्गी हायस्कूल, अशोक देसाई ज्युनिअर कॉलेज तेरणी, क्रिएटिव्ह ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज, साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेंट झेवियर्स ज्युनिअर कॉलेज नेसरी, शिवराज इंग्लिश मीडियम स्कूल गडहिंग्लज, एम. एच. शिंदे महाविद्यालय तिसंगी, माध्यमिक विद्यालय शेळोशी, आनंदी आर्टस्, कॉमर्स, सायन्स कॉलेज, पाराशर हायस्कूल पारगाव, नॅशनल हायस्कूल, इचलकरंजी हायस्कूल, तात्यासाहेब कोरे मिलिटरी ॲकॅडमी, एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन मिणचे, वारणा विद्यानिकेतन नवे पारगाव, संजय घोडावत ज्युनिअर कॉलेज अतिग्रे, रजत ज्युनिअर कॉलेज हुपरी, श्री. शामराव पाटील हायर सेकंडरी स्कूल तळसंदे, डीकेटीई, श्रद्धा ज्युनिअर कॉलेज, जगताप इंटरनॅशनल स्कूल, बिशाप इंग्लिश मीडियम स्कूल, युनिक हायस्कूल इचलकरंजी, हुपरी इंग्लिश स्कूल, महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज रुकडी, एम. जी. शहा ज्युनिअर कॉलेज बाहुबली, न्यू इंग्लिश स्कूल सदाशिवनगर आणि लिंगनूर, श्रद्धा मॉर्डन स्कूल कागल, बोते ज्युनिअर कॉलेज, इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूल बोरीवडे, एम. आर. पाटील विद्यानिकेतन बाचणी, श्री. यशवंत घाटगे विद्यालय हायस्कूल कागल, जनता शिक्षण मंडळ प्रायव्हेट आयटीआय, मेजर आनंदराव घाटगे प्रायव्हेट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयटीआय, देवचंद ज्युनिअर कॉलेज, दूधसाखर ज्युनिअर कॉलेज बिद्री, श्री. कल्लेश्वर माध्यमिक विद्यालय कसबा बीड, जी. बी. पवार पाटील माध्यमिक विद्यालय घानवडे, बी. एच. पाटील ज्युनिअर कॉलेज खुपीरे, सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल गोकुळ शिरगाव, डॉ. तानाजीराव चोरगे ज्युनिअर कॉलेज नंदवाळ, सांगरुळ आयटीआय, छत्रपती शाहू विद्यालय न्यू पॅलेस, चाटे हायस्कूल शाहूपुरी, प्रायव्हेट हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, शाहू दयानंद हायस्कूल, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज, विमला गोयंका ज्युनिअर कॉलेज, शासकीय आयटीआय, डीआरके कॉलेज, स्वामी स्वरूपानंद विद्यालय तिरपण, श्री. रामचंद्र ज्युनिअर कॉलेज, बाबासाहेब पाटील ज्युनिअर कॉलेज कोतोली, पन्हाळा व्हॅली, जोतिर्लिंग ज्युनिअर कॉलेज पुनाळ, क्रांती ज्युनिअर कॉलेज, गंगा ज्युनिअर कॉलेज परखंदळे, नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल, फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल काले, हुतात्मा नंदकुमार पाटील ज्युनिअर कॉलेज, श्री. सिद्धेश प्रायव्हेट आयटीआय बाजारभोगाव, विद्यालंकार भवन ज्युनिअर कॉलेज शेळेवाडी, एच. बी. पाटील ज्युनिअर कॉलेज कपिलेश्वर राधानगरी, एम. महाडिक सेकंडरी स्कूल दुर्गमानवाड, पी. एन. पाटील ज्युनिअर कॉलेज, राजर्षी शाहू ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स राधानगरी, बी. के. पाटील कौलवकर हायस्कूल, जेनिसिस इंटरनॅशनल स्कूल, इंदिरा गांधी हायस्कूल सरुड, दत्तसेवा विद्यालय, प्रदीप पाटील ज्युनिअर कॉलेज डोणोली, शरद सायन्स अँड कॉमर्स कॉलेज यड्राव, गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल, चैतन्य पब्लिक स्कूल, अनेकांत इंग्लिश मिडियम स्कूल जयसिंगपूर, जे. के. मुळीक इंग्लिश मिडियम स्कूल, जयसिंगपूर आयटीआय, शीतल केटकाळे आयटीआय शिरोळ, पद्माराजे ज्युनिअर कॉलेज शिरोळ यांचा समावेश आहे.
...
यशस्वितांवर शुभेच्छांचा वर्षाव
निकालाबाबत विद्यार्थ्यांना धाकधूक लागली होती. दुपारी एकनंतर स्मार्टफोन, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर उत्तीर्ण झाल्याचा निकाल दिसल्यानंतर विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले. काहींनी फटाके वाजवून, तर अनेकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यशस्वितांवर त्यांचे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, कुटुंबीयांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांच्या स्टेटस, डीपीवर बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, छायाचित्रासह अभिनंदनाची पोस्ट झळकली.
...
तालुका* मुले* मुली
गगनबावडा*९७.६०*९८.९०
पन्हाळा*९८.०६*९८.७७
शाहूवाडी*९६.१०*९८.६९
करवीर*९५.१३*९८.५२
गडहिंग्लज*९६.४३*९८.५९
राधानगरी*९८.०८*९८.३८
भुदरगड*९४.१९*९८.३६
चंदगड*९४.६१*९८.२३
आजरा*९६.३२*९७.८७
हातकणंगले*९३.९१*९७.६८
शिरोळ*८९.७२.९७.४६
कोल्हापूर शहर*९२.०५*९७.१९
कागल*९१.३१*९६.२३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अजूनही धडा घेतला नाही...'; NEET पेपर लीकवर NTA ला फटकारत सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि CBI ला नोटीस

Kothrud fraud Case : कोथरूडमध्ये फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने भागीदाराला अडीच कोटींचा गंडा; आर. के. लाईफस्पेस डेव्हलपर्सवर गुन्हा

Yewalewadi Murder Case: येवलेवाडीत चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीचा गॅस टाकीने खून

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर

'ही कास्टिंग पटलच नाही!' वरुण धवनच्या चित्रपटात १ वर्षांनी मोठी अभिनेत्री बनली त्याची आई, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT