jsp2120
84976
यड्राव ः येथे सिव्हिलच्या विद्यार्थ्यांनी ग्लासवूलचा वापर करून उष्णतारोधक पॅनल बनवले आहे.
-------------
ग्लासवूलद्वारे उष्णतारोधक गिलावासदृश पॅनेलची निर्मिती
शरद इंजिनिअरिंगच्या प्राध्यापक, विद्यार्थ्यांचे संशोधन : पेटंट रजिस्टर
सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता.२१ ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी ग्लासवूलचा वापर करून उष्णतारोधक पॅनेल (गिलावाऐवजी आवरण) बनवले आहे. त्यांच्या या ‘मॉडेल ऑफ इन्स्युलेटेड प्लास्टर पॅनेल’ या संशोधनाचे पेटंट रजिस्टर झाले असून, गिलाव्यासाठी (प्लास्टर) सध्या वापरत असलेल्या अन्य साहित्यापेक्षा हे बनवलेले पॅनेल स्वस्त, मजबूत व उष्णतारोधक असल्याने फायद्याचे ठरणार आहे. सिव्हिल विभागातील प्रा. आशिष जाधव, विद्यार्थी संदेश कांबळे, अभिषेक काश्मिरे, आसिफ मणेर, शुभम आलासे, प्रतीक ठिगळे यांनी हे पेटंट रजिस्टर केले आहे.
गिलाव्यासाठी पारंपरिक वाळू, क्रशसँड व जिप्समचा वापर केला जातो. त्यामुळे भिंती उन्हाळ्याच्या दिवसात गरम होतात. त्यामुळे घरातील तापमान वाढते, परंतु या संशोधनामुळे भिंतीसाठी गिलाव्याची गरज नाही. तसेच हे पॅनेल आकाराने लहान असल्यामुळे भिंतीवर बसवू शकतो. ते रंगवू शकतो. हे पॅनेल वापर उष्णतारोधक असल्याने घरातील तापमान कमी राहते. त्यामुळे विद्युत ऊर्जेचा वापरही कमी होतो.
ग्लासवूल, सिमेंट, जिप्सम या घटकांचा वापर करून हे पॅनेल तयार केले जाते. यामुळे मजुरीमध्ये ६० टक्क्यांपर्यंत खर्च कमी होतो. तसेच साहित्याच्या खर्चामध्ये ५३ टक्क्यांपर्यंत बचत करता येते. त्यासाठी कोणत्याही कुशल कामगाराची गरज लागत नाही. संशोधनासाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
----------
हे पॅनेल हलके, स्वस्त व भिंतीला सहजपणे बसवता येते. तसेच ग्लासवूलच्या वापरामुळे बाहेरील उष्णता प्रतिबंधित होते. आतील तापमान कमी राहण्यास मदत होते. या संशोधनामुळे शरदच्या विद्यार्थ्यांना स्वत: उद्योजक होण्याची व रोजगार निर्माण करण्याची संधी मिळत आहे.
-प्रा. अशिष जाधव, मार्गदर्शक, शरद इंजिनिअरिंग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.