फोटो 85048
डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमधील
प्लेसमेंट ड्राईव्हला प्रतिसाद
कोल्हापूर, ता. २१ ः श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये ‘किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड’ कंपनीचा पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह झाला. विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेतील उमेदवारांनी ड्राईव्हमध्ये सहभाग घेतला. सक्षम उमेदवारांना वार्षिक ३.७५ लाख रुपयांचे पॅकेज ऑफर करण्यात आले.
‘डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी’ पदासाठी उमेदवारांच्या तांत्रिक कौशल्याची तपासणी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात आली. ‘नवनवीन तंत्रज्ञान व कौशल्ये आत्मसात करून औद्योगिक क्षेत्रामध्ये निरंतर प्रगती साधता येते. त्यामुळे उमेदवारांनी नावीन्याचा ध्यास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे,’ असे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पंकज व्हटकर यांनी सांगितले. या ड्राईव्हसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन मिळाले. कंपनीच्या वतीने पंकज व्हटकर, अमित पिसाळ, खंडू वाईकोज यांनी काम पाहिले. डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटचे प्राचार्य विरेन भिर्डी यांनी आयोजन केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. पी. टी. पानसरे, प्रा. ए. आर. नदाफ यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.