कोल्हापूर

वित्त व लेखाधिकाऱ्यांविरोधात विद्यापीठ सेवकांची निर्दशने

CD

85055
...
वित्त व लेखाधिकाऱ्यांविरोधात
विद्यापीठ सेवकांची निदर्शने

प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन; सवलती, लाभापासून वंचित ठेवल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः वित्त व लेखाधिकारी या सवलती आणि लाभांपासून वंचित ठेवत असल्याचे सांगत आज शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या पदाधिकारी, सदस्यांनी निदर्शने केली. त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले. संघाच्या मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर सेवकांनी आंदोलन मागे घेतले.
शिक्षकेतर सेवकांच्या प्रलंबित मागण्या- जादा कामाचा मोबदला (ओव्हर टाईम), रजा, प्रवास सवलत मिळण्यास प्रशासनाकडून दिरंगाई करण्यात येऊ नये. सूडभावनेने, पूर्वग्रहदूषित व आकसबुद्धीने केलेल्या अंतर्गत विभागीय बदल्या रद्द कराव्यात. या मागण्यांसाठी मुख्य प्रवेशद्वारामध्ये सकाळी अकरा वाजता सभा घेण्यात आल्याचे सेवक संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सांगितले.
प्रशासन आणि वित्त व लेखाधिकाऱ्यांकडून सेवकांच्या प्रश्नाबाबतची उदासीनता असून सेवकांना मिळणाऱ्या सवलती, लाभांपासून वंचित ठेवले जात आहे. वित्त व लेखाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तसेच त्यांच्याकडून सेवकांना मिळणाऱ्या हिनपणाच्या वागणुकीबाबत वेळीच अंकुश ठेवणे गरजेचे असल्याची भूमिका भोसले यांनी मांडली. त्यानंतर तेथेच ठिय्या आंदोलन सुरू झाले. त्यात सेवकांनी वित्त व लेखाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात दुपारी दीड वाजेपर्यंत जोरदार निदर्शने करून घोषणाबाजी केली.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या निर्देशानुसार कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सेवक संघाचे अध्यक्ष भोसले यांच्यासह कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यात जादा कामाच्या मोबदल्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रचलित पद्धतीनुसार रजा प्रवास सवलत मंजूर करण्यात येईल. पूर्वग्रहदूषित, आकसबुद्धीने केलेल्या अंतर्गत विभागीय बदल्या रद्द करण्याबाबतची कार्यवाही लवकर करण्यात येईल, असे आश्वासन कुलसचिव डॉ. शिंदे यांनी दिल्यानंतर प्रशासनाच्या विनंतीनुसार ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. संघाच्या द्वारसभेस उपाध्यक्ष संजय पोवार, सरचिटणीस राम तुपे, चंद्रशेखर कदम, राजेंद्र खामकर आदी उपस्थित होते.
...
...तर तीव्र आंदोलन करणार
‘प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची आठवड्याभरात पूर्तता करावी, अन्यथा सेवक संघातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल’, असा इशारा भोसले यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT