कोल्हापूर

पोलिसवृत्त २

CD

मिरवणुकीत तरुणास मारहाण
कोल्हापूरः सावर्डे (ता. हातकणंगले) येथे सोमवारी रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अनिल संताजी चव्हाण (वय ३४) यांना मारहाण करण्यात आली. रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. राजकीय वादातून ही मारहाण झाल्याचे जखमीने पोलिसांना सांगितले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
...
विषारी द्रव प्यायल्याने वृद्धाचा मृत्यू
कोल्हापूर ः विषारी द्रव प्यायल्याने प्रकृती चिंताजनक बनलेले दगडू यशवंत पाटील (वय ६३, रा. म्हाळुंगे तर्फ बोरगाव, ता. पन्हाळा) यांचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी राहत्या घरी त्यांनी विषारी द्रव प्यायले होते. त्यांना नातेवाइकांनी उपचारासाठी तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे चार वाजता त्यांचा मृत्यू झाला. सीपीआर पोलिस चौकीत घटनेची नोंद झाली.
...
85072
भरधाव ट्रकची मोटारीला धडक ः ८ जखमी
कोल्हापूर, ता. २१: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्यानजीक भरधाव ट्रकने मोटारीला दिलेल्या धडकेत आठ जण जखमी झाले. सोमवारी दुपारी झालेल्या अपघातातील जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचाराला आणण्यात आले. धडक दिल्यानंतर ट्रकचालक पसार झाला.
मोटारीतील सारंग अशोक सातपुते (वय ३४), अशोक महादेव सातपुते (वय ५३), सपना अशोक सातपुते (वय ५० रा. तिघे कोगे, ता. करवीर), रंजना मार्तंड दाभाडे (वय ६८ रा. राजारामपुरी), प्रगती सुनील लोंढे (वय ८), काजल सुनील लोंढे (३६), सुनील दत्तात्रय लोंढे (वय ३६ रा. तिघे नागाव, ता. करवीर), मंगल निवृत्ती दबडे (वय ६५ रा. कुशिरे ता. पन्हाळा) जखमी झाले.
.......
अपघातात जखमी
तरुणाचा मृत्यू
कोल्हापूर ः सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातातील जखमी दीपक बबन भडकुंबे (वय ३८, रा. मार्केटयार्ड परिसर) यांचा मंगळवारी (ता. २१) मृत्यू झाला. डोक्यात वेदना होऊन बेशुद्ध झाल्याने त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी सांगितले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
...
मारहाणीत महिला जखमी
कोल्हापूरः सोनतळी (ता.करवीर) येथे झालेल्या मारहाणीत कमल तानाजी वाठारकर (वय ४२) जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची नोंद करवीर पोलिसांत करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Loni Kalbhor crime news: विषारी रासायनिक ताडी प्रकरणात लोणी काळभोरमध्ये आई-मुलगा अटकेत; घातक स्फटिकांसह मुद्देमाल जप्त

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT