85065
...
‘कॉमेलिनेसी ऑफ इंडिया’ संशोधकांसाठी महत्त्वाचा ठेवा
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के; शिवाजी विद्यापीठात डॉ. गुरव, नंदीकर यांच्या ग्रंथाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः ‘कॉमेलिनेसी ऑफ इंडिया’ हा संदर्भग्रंथ वनस्पतीशास्त्राच्या भावी संशोधकांसाठी एक महत्त्वाचा ठेवा आहे. अशा प्रकारचे संशोधन व संदर्भसंचय आपल्या हातूनही व्हावा. त्यासाठीची प्रेरणा वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासक, संशोधकांनी यापासून घ्यावी’, असे आवाहन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजाराम गुरव आणि डॉ. मयूर नंदीकर यांच्या ‘कॉमेलिनेसी ऑफ इंडिया’ अर्थात ‘केना कुळातील भारतीय वनस्पती’ या संदर्भग्रंथाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहातील या कार्यक्रमात संशोधक प्रा. डॉ. एस. आर. यादव, पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. रितेश कुमार चौधरी यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘डॉ. गुरव आणि नंदीकर यांच्या समर्पणवृत्तीमुळेच वनस्पतीशास्त्राच्या एका शाखेमधील महत्त्वाचा संदर्भग्रंथ साकार झाला. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून नवसंशोधकांनी आपल्या संशोधनकार्याला दिशा द्यावी.’
डॉ. चौधरी म्हणाले, ‘विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी वनस्पतीशास्त्राच्या संशोधनात, विशेषतः पश्चिम घाटावरील वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रजातींविषयी संशोधन, संवर्धन या अनुषंगाने मोलाचे योगदान दिले आहे. या परिसरातील संशोधनामध्ये मलाही काही वाटा उचलता आला, याचे समाधान वाटते.’
डॉ. नंदीकर यांनी ग्रंथात आफ्रिका आणि आग्नेय आशियातील १३१ प्रजातींसह भारतातील कोमेलिनेसी कुटुंबातील विविध प्रजातींची टीपांसह माहिती दिली असल्याचे सांगितले. डॉ. गुरव यांनी सन १८७९ मध्ये ब्रिटिश अभ्यासक आल्फ्रेड यंग यांनी पश्चिम महाराष्ट्रातून या प्रजातींमधील काहींचे संकलन केले होते आणि त्यांची माहिती ब्रिटिश म्युझियममध्ये होती. डॉ. नंदीकर यांच्या संशोधनाद्वारे आणि आता या ग्रंथाद्वारे ती माहिती वनस्पतीशास्त्रांना उपलब्ध झाली असल्याचे सांगितले. डॉ. मनोज लेखक यांनी स्वागत केले. डॉ. घाणे यांनी आभार मानले.
...
ग्रंथाची वैशिष्ट्ये ...
प्रख्यात ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ सी. बी. क्लार्क यांच्या १८८१ मधील कॉमेलिनेसीवरील मोनोग्राफनंतरचे महत्त्वाचे ठळक कार्य, १२ नवीन नावे आणि प्रजाती, १३ नवीन समानात्म प्रजाती, १०८ द्विपदींचे वर्गीकरण, १३१ नावांसाठी ५१६ द्विपदींची नोंद, केना कुळातील वनस्पती त्यांची प्रदेशनिष्ठता आणि ओळख, गुणसूत्रांची संख्या निश्चितीकरण, १०० पेक्षा जास्त रेखाचित्रे आणि छायाचित्रे आदी या ग्रंथाची वैशिष्ट्ये आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.