कोल्हापूर

सहा सामन्यांचा निकाल टायब्रेकरवर

CD

85053
कोल्हापूर ः शाहू छत्रपती केएसए ‘सी’ डिव्हिजन लीग फुटबॉल स्पर्धेत बीजीएम स्पोर्टस् ‘बी’ आणि आयजी ग्रुप यांच्यात झालेल्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
.............
लोगो ः केएसए ‘सी’ डिव्हिजन लीग फुटबॉल स्पर्धा

सहा सामन्यांचा निकाल टायब्रेकरवर

बीजीएम स्पोर्टस् बी, जय शिवराय तरुण मंडळ, वारे वसाहत तालीम संघ विजयी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : शाहू छत्रपती केएसए ‘सी’ डिव्हिजन लीग फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या सामन्यांत सहा सामन्यांचा निकाल टायब्रेकरचा अवलंब करून झाला. यामध्ये बीजीएम स्पोर्टस् बी, जय शिवराय फुटबॉल तरुण मंडळ, वारे वसाहत तालीम संघ यांनी विजय मिळवला. छत्रपती शाहू स्टेडियम आणि पोलो मैदानावर सामने खेळवले गेले.
सामन्यांचा निकाल पुढीलप्रमाणे ः पोलो मैदानावर सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रात सामने झाले, यामध्ये शिव स्पोर्टसने आराम कॉर्नर स्पोर्टसचा ३:० गोलने पराभव केला. ओंकारेश्वर फुटबॉल क्लब वि. सणगर गल्ली फुटबॉल संघ यांच्यात झालेला रंगतदार सामन्यात ओंकारेश्वरने ३:२ गोलने विजय मिळवला. वडणगे फुटबॉल असोसिएशनने चक्रव्यूह तालीमचा १:० ने पराभव केला. जय शिवराय फुटबॉल तरुण मंडळने मरगाई तालीम मंडळाचा २:० गोलने पराभव केला.
तटाकडील तालीम मंडळ वि. अजित फुटबॉल क्लब यांच्यात झालेला सामना निर्धारित वेळेत बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. त्यात अजित फुटबॉल क्लबने ३:२ गोलने सामना जिंकला, तर वारे वसाहत तालीम मंडळाने मंगळवार पेठ क्लब (बी) संघाचा ४:१ गोलने पराभव केला.
राजर्षी शाहू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्वराज्य फुटबॉल क्लबने राजेंद्रनगर फुटबॉलचा ३:० गोलने एकतर्फी पराभव केला. संयुक्त न्यू शाहूपुरी फुटबॉल क्लब वि. क्रांतिवीर राजगुरू तरुण मंडळ यांच्यातील सामना पूर्ण वेळेत बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यामध्ये क्रांतिवीर राजगुरू तरुण मंडळने ३:२ गोलने विजय पटकावला. कदमवाडी फुटबॉल संघाने झुंझार क्लब ‘बी’चा १:० ने पराभव केला. बागल चौक फुटबॉल क्लबने जुना बुधवार तालीम मंडळाचा १:० गोलने पराभव केला. शाहूपुरी कुंभार स्पोर्टसने हिंद तरुण मंडळचा २:० गोलने पराभव केला. मावळा ग्रुप वि. मस्कुती स्पोर्टस यांच्यातील सामना बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब केला. यात मस्कुती स्पोर्टसने ३:० गोलने विजय मिळवला. बीजीएम स्पोर्टस ‘बी’ आणि आय जी ग्रुप यांच्यातील सामना प्रेक्षणीय झाला. हा सामना बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यामध्ये बीजीएम स्पोर्टसने आयजी ग्रुपचा ३:१ गोलने पराभव केला. मोहन मलबारी तरुण मंडळ वि. कीर्ती तरुण मंडळ यांच्यातील सामना बरोबरीत झाला. त्यात टायब्रेकरमध्ये कीर्ती तरुण मंडळाने ३:० गोलने विजय मिळवला.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT