लोगो
...
चारा निर्मितीसाठी एक कोटी मंजूर
जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा : वर्षभर पशुसंवर्धन विभागाकडून होणार बियाणे वाटप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यात चारा टंचाई जाणवते. चाऱ्यासाठी विविध उपाय करावे लागतात, यासाठी अनेक ठिकाणी धावपळ करावी लागते. जिल्ह्यात कधीच चाराटंचाई निर्माण होऊ नये म्हणून चार दुष्काळसदृश तालुक्यांसोबत संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी, दुग्ध उत्पादकांना मोफत चारा बियाणे वाटप केले जाणार आहे. यासाठी, जिल्हा परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज एक कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली.
जिल्ह्यात काही तालुक्यात चाराटंचाई जाणवते. प्रत्येक वर्षी हा प्रश्न उद्भवत आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेने एक कोटी रुपयांची योजना आणली आहे. यामध्ये विविध चाऱ्यांसाठी लागणारे बियाणे मोफत दिले जाणार आहे. यावेळी प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सामान्य प्रशासन तथा आस्थापनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, विभाग प्रमुख तसेच सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते. सीईओ कार्तिकेयन एस यांनी आढावा घेत विविध विभागाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. यामुळे सर्वसाधारण सभेत धोरणात्मक निर्णय घेतलेले नाहीत. हे सर्व विषय व निर्णय जिल्हा परिषदेच्या पुढील सर्वसाधारण सभेमध्ये घेतले जावेत, अशा सूचना दिल्या. यासह यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२३-२४ अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्रस्तावास शिफारस दिली आहे. पशुसंवर्धन विभागाकडील जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन २०२४-२०२५ दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रमातंर्गत पशुखाद्य विकास कार्यक्रम योजनेस मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत सुमारे एक कोटी रुपयांचे बियाणे देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात चारा निर्मिती केली जाणार आहे. यासाठी संबंधित विभागाने काळजीपूर्वक लक्ष द्यावे, अशा सूचना कार्तिकेयन एस. यांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.