कोल्हापूर

शहरातील ४५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

CD

फोटो : 85078

मोफत पाठ्यपुस्तक वाटपास प्रारंभ
शहरातील १९० प्राथमिक शाळांतील ४५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे शहरातील सर्व शाळांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत आजपासून मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू करण्यात आले. शहरातील १९० प्राथमिक शाळांतील सुमारे ४५ हजार ३७८ विद्यार्थ्यांकरिता १ लाख ८१ हजार ५१२ पुस्तकांच्या प्रती प्राप्त झाल्या आहेत.
ही पाठ्यपुस्तके आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या इमारतीत सुरक्षितपणे ठेवण्यात आली आहेत. आज प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांच्या हस्ते शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांकडे पाठ्यपुस्तके सुपूर्द करण्यात आली. यावेळी शाळांना पाठ्यपुस्तकांच्या सुरक्षिततेबाबत सूचना देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर टाकणारा पाठ्यपुस्तक हा एक महत्त्वाचा घटक आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मराठी, उर्दू, सेमी इंग्रजी, इंग्रजी माध्यमाच्या शासकीय व अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. ही पुस्तके विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये समारंभपूर्वक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी समाजसेवक, शिक्षणप्रेमी, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्यात येऊन शाळेचा पहिला दिवस हा ‘बुक डे’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, बाळासो कांबळे, राजेंद्र आपुगडे, विक्रम भोसले, अविनाश लाड, राजू गेंजगे, शांताराम सुतार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT