कोल्हापूर

पाण्यासाठी निवेदन

CD

85316
कोल्हापूर : पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने अंबाबाई मंदिर परिसरातील नागरिकांनी जल अभियंत्यांना पाणी बाटल्या देत निषेध केला.

विकतच्या पाण्याची बाटली देत
अनियमित पाणीपुरवठ्याचा निषेध
अंबाबाई मंदिर, बालगोपाल तालीम परिसरातील नागरिक संतप्त
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : अंबाबाई मंदिर, बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटी परिसरात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिकांनी विकत घेतलेली पाण्याची बाटली महापालिकेला देऊन अनोख्या पद्धतीने निषेध केला. भाजप लक्ष्मीपुरी मंडलतर्फे जलअभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, अनेक दिवस अपुरा पाणीपुरवठा होत आहे. तक्रार करूनही स्थानिक राजकारणामुळे दुर्लक्ष केले जाते. येथे आलेले पाण्याचे टँकर जबरदस्तीने दुसऱ्या भागात पाठवले जातात. पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली जाते. काही लोकप्रतिनिधी मुद्दाम या गोष्टी करत आहेत. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याचा निषेध म्हणून नागरिकांनी विकतची पाण्याची बाटली देऊन निवेदनही देण्यात आले. यावेळी रश्मी साळोखे, सुरेश गुजर, अवधूत भाटे, प्रसाद नरुले, संग्राम पाटील, जनार्दन पोवार, रविराज पोवार, स्वरूपा पोवार, संगीता हुक्केरी, उज्ज्वला खोराटे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

Gemini Horoscope : मिथुन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): तुमचे निर्णय ठरणार गेमचेंजर; प्रेम, करिअर, पैसा सगळं एकदम हाताला लागणार

SCROLL FOR NEXT