कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा संघाची कसोटी

CD

85371
कोल्हापूर : आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना झालेल्या संघासमेवत मधुरिमाराजे छत्रपती. सोबत माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, नंदकुमार बामणे आदी.
................
कोल्हापूर जिल्हा संघाची कसोटी

नवोदित खेळाडूंचा कस : तेरा वर्षांखालील आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा शिरपूर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : शिरपूर (जि. धुळे) येथे उद्या (शुक्रवा) पासून होणाऱ्या आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा १३ वर्षांखालील संघ रवाना झाला आहे. उद्या रायगड संघाविरुद्ध कोल्हापूर संघ आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. स्पर्धेसाठी कोणत्याच संघाला मानाकंन नसल्याने सर्वच नवोदित खेळाडूंचा कस लागणार आहे. मुंबई संघ स्पर्धेचा ''फेव्हरिट'' मानला जात आहे. स्पर्धेत ३२ जिल्हा संघांचा सहभाग आहे.
स्पर्धेसाठी ३२ संघांची एकूण चार गटांत विभागणी केली आहे. ‘ड’ गटात कोल्हापूरचा समावेश आहे. रायगड संघाविरुद्ध कोल्हापूरची सलामी आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीत तुल्यबळ ठाणे संघाशी गाठ पडण्याची शक्यता आहे. उपात्यंपूर्व फेरीत वाशिम-वर्धा, गोंदिया-हिंगोली यांच्यातील विजेत्याशी लढावे लागेल. उपांत्यफेरीत ‘क’ गटातील बलाढ्य नागपूर किंवा पुणे विरुद्ध लढतीचे संकेत आहेत. तुलनेत ‘अ’ गटातून अव्वल मुंबईला उपांत्यफेरीत पोहोचण्याची सोपी संधी आहे.
निवड चाचणीसाठी २०० हून अधिक खेळाडू आले होते. त्यातून स्पर्धेसाठी २४ खेळाडू निवडले गेले होते. कोल्हापूर जिल्हा संघाचे गेले अकरा दिवस शाहू स्टेडियमवर सराव शिबिर झाले. प्रदीप साळोखे, राजू राऊत, अमित शिंत्रे यांनी सराव घेतला. यातून अंतिम १८ खेळाडूंची निवड झाली. संघाला कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या मधुरिमाराजे छत्रपती, माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, नंदकुमार बामणे, मनोज जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.
....
चौकट..
जिल्हा संघ असा
वीर पाटील, सक्षम साळोखे (गोलरक्षक), क्षितिज पारस्कर, पृथ्वीराज चव्हाण, प्रज्वल काळे, श्रीरंग प्रभू, आर्यन साठे, शिवराज तावडे, राजवीर खराडे, साईराज सुतार, सोहम शिंत्रे, आरंभ पाटील, देवराज पोवार, वरद खाडे, धीरज कुरबेट्टी, सार्थक हवालदार, वेदांत नारायणपुरे, स्वयंम पाटील.
.....
कोट...
खेळाडूंनी चांगला सराव केला आहे. दुसऱ्या फेरीपासून खेळाडूंना अधिक कामगिरी उंचावावी लागेल. खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
- संतोष पवार, शरद मेढे
प्रशिक्षक, जिल्हा संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 Highlights : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या 10 महत्वाच्या घोषणा, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Union Budget 2026 Live : प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल बांधणार

Praful Patel Clarification : राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर मोठा गोंधळ! अखेर प्रफुल पटेलांनी दिलं स्पष्टीकरण

Union Budget 2026 : शेती मातीसाठी बजेटमध्ये काय मिळालं,‘भारत विस्तार एआय’ची घोषणा; शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती

Union Budget 2026: अर्थसंकल्पात बँकिंग क्षेत्राबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा, सरकारचा Banking Reforms वर असणार जोर

SCROLL FOR NEXT