कोल्हापूर

गृहरक्षक दल आणखीन बळकट करणार

CD

86526
...
गृहरक्षक दलाच्या ९ हजार जागा भरणार
महासमादेशक रितेशकुमार यांची माहितीः जिल्ह्यात होणार २०० जणांची भरती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः सण, उत्सव, आंदोलनांसह निवडणूक काळात पोलिसांच्या बरोबरीने गृहरक्षक दलाच्या जवानांनी कामगिरी बजावली आहे. राज्यात ५५ हजार पदे मंजूर असून ४६ हजार होमगार्ड सेवेत आहेत. रिक्त ९ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून कोल्हापुरातही २०० पदांसाठी भरती घेण्यात येणार असल्याचे अप्पर पोलिस महासंचालक तथा गृहरक्षक दलाचे नूतन महासमादेशक रितेशकुमार यांनी सांगितले.
सोमवारी त्यांनी कोल्हापूर गृहरक्षक दलाच्या जिल्हा कार्यालयाला भेट दिली. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच कोल्हापूर विभागाच्या कामगिरीची माहिती दिली. निवडणूक बंदोबस्तामध्ये होमगार्डनी उत्तम कामगिरी बजावली आहे. याबाबत रितेशकुमार यांनी कोल्हापूर विभागाचे कौतुक केले.
राज्यभरात सर्वच सण, उत्सव काळात होमगार्डची मदत घेण्यात येत आहे. बाहेरील बंदोबस्ताऐवजी होमगार्डचा चांगला पर्याय उपलब्ध असल्याने त्यांना आणखीन सुविधा देण्यावर भर दिला जाईल. पोलिसांच्या मदतीला असलेल्या होमगार्डचे मानधन ६७० रुपये असून त्यामध्ये वाढ करण्याचा विचारही सुरू असल्याचे रितेशकुमार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Bhima Water Politics: भीमा नदीत पाणी सोडण्यावर श्रेयवादाची लढाई; राजकीय नेत्यांच्या वादात नदीकाठचा शेतकरी होरपळला

Gen Z Trend Deadzoning: मोबाइल बंद, लॅपटॉप बंद; Gen Z आणि Millennials मध्ये ‘डेडझोनिंग’ची क्रेझ; नेमकं 'हे' आहे तरी काय ?

Tembhapuri Dam Tragedy: टेंभापुरी धरणात १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप

Pune Ragging : पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज वसतिगृहात रॅगिंग प्रकरण उघड

SCROLL FOR NEXT