कोल्हापूर

हत्ती रोग दाखले

CD

जिल्ह्यातील हत्तीरोग रुग्णांना
दिव्यांग दाखल्यांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : जिल्हा हिवताप विभागातर्फे जिल्ह्यातील हत्तीरोग रुग्णांना दिव्यांगत्वाचे दाखले देण्यात आले. सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे यांच्या हस्ते या दाखल्याचे वाटप झाले.
राज्य शासनातर्फे दिव्यांगाना दाखले देण्यात येतात. यात हत्तीरोगांचाही समावेश झाला आहे. त्यानुसार हिवताप विभागाकडे जिल्ह्यातील २६ हत्तीरोग रुग्णाची नोंद आहे. यापैकी २२ रुग्णांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यासाठी सीपीआर रुग्णालयातील वैद्यकीय तज्‍ज्ञांकडून या रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच हिवताप विभागाने या रुग्णांना हिवताप झाल्याचे निदान केले. त्यानुसार या रुग्णांचा दिव्यांग व्यक्तीसाठी देण्यात येणारे प्रमाणपत्र देण्यात आले. राज्य शासनाच्या आदेशानुसार हत्ती रोग झालेल्या रुग्णांनाही दिव्यांगाच्या सवलतींचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे यांनीही हत्तीरोग रुग्णांना मार्गदर्शन केले. सहायक जिल्हा हिवताप अधिकारी जे. के. कांबळे यांनी आभार मानले. डॉ. सागर नाईक, नितीन कांबळे, विलास चौगुले, राहुल डोंगळे, अमृत सुतार, एस. पी. चिखले, शंकर कुंभार, जावेद मुल्ला आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah Rukh Khan FDA Notice : तुकाराम मुंढे शाहरुख खानवर कारवाई करणार? FDA च्या नोटीसीला उत्तर न दिल्याने पुढील प्रक्रिया सुरू

6:30 वाजता WFH करण्यास सांगितलं, 9:30 वाजता Google Meetची लिंक आली अन् अवघ्या 5 मिनिटांत 80 जणांची नोकरी गेली; नक्की काय घडलं?

अकरावीत आईला म्हणाल्या मला रुचीरशीच लग्न करायचंय! मृणाल कुलकर्णी यांनी प्रेमासाठी केलेली बंडखोरी, अशी खुललेली लव्हस्टोरी

Ladki Bahin Yojana Latest Update : 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार! लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT