कोल्हापूर

जिल्हा बस वाहतूक निवेदन- आरटीओ

CD

86640
...

वाहनचालक परवान्याचे होणारे
खासगीकरण त्वरित थांबवा
बस वाहतूकदारांचे निवेदनः कार्यालयासमोर थांबलेल्या बसेसवर कारवाई नको

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः वाहन चालक परवान्याचे होणारे खासगीकरण त्वरित थांबवावे यांसह अन्य मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेच्या शिष्‍टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना दिले.
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, देशात बेरोजगारी वाढत असताना परिवहन विभागाने खासगीकरणाचा घाट घातला आहे. वाहन चालक परवान्याचे होणारे खासगीकरण त्वरित थांबवावे ही प्रमुख मागणी आहे. पूर्वीप्रमाणेच किंवा सद्यस्थितीत सुरू असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांकडेच त्याचे अधिकार ठेवावेत. काही ठिकाणी चेकपोस्टचे खासगीकरण झाले आहे, त्यामुळे वाहतूकदारांची पिळवणूक वाढत आहे. वाढती बेरोजगारी, वाढता भ्रष्टाचार रोखण्यासाठी चेकपोस्टचे खासगीकरण रद्द करावे, फिटनेस- योग्यता प्रमाणपत्रावरील विलंबासाठी दंडाची रक्कम अधिक आहे, तो दंड भरणे वाहतूकदारांना परवडणारे नाही. त्यामुळे तीही वाढ मागे घ्यावी, खासगी आरामबसेच प्रत्येक मार्गावरील किंवा किलोमीटरप्रमाणे वेळेप्रमाणे विमानासारखे कमीत कमी तिकीट दर निश्‍चित करावा. तसेच कमीत कमी तिकीट दरापेक्षा कमी दराने तिकीट आकारणी करणाऱ्यांवर देखील कारवाई करावी, यातून व्यवसायातील गळचेपी स्पर्धा बंद होईल. शिष्टमंडळात अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे, सुभाष शेटे, रफिक रावथर, रियाज मुजावर, उत्कर्ष पवार, इम्तियाज हकीम, प्रवीण शिंदे, फारूक मुल्ला, इर्शाद फरास, गणेश गर्दे, गुंडा घाडगे, अरुण परीख आदींचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चिखलदऱ्याला जाण्यापूर्वी ही बातमी वाचा! वीकेंडला वनवे नियम लागू; प्रशासनाचा मोठा निर्णय

Nagpur Pune Vande Bharat: प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणार नवीन १६/२० डब्यांचा रेक; विदर्भ–पश्चिम महाराष्ट्र प्रवास होणार सोयीचा

Pune FDA Action: पुण्यात एफडीएचा मोठा दणका! अस्वच्छता आणि नियमभंगामुळे सहा हॉटेलांचे परवाने निलंबित, ७० हॉटेलांची तपासणी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शहराबाहेर नेण्याचा घाट कुणासाठी? बच्चू कडू अन् संजय खोडके आक्रमक, सरकारला विचारला संतप्त सवाल

Pune News: कोट्यवधींचा खर्च, तरी गळके छत! कोथरूड स्मशानभूमीचा व्हिडिओ व्हायरल; पुणे महापालिकेची धावपळ

SCROLL FOR NEXT