कोल्हापूर

गड-व्यक्तिमत्व शिबीर

CD

फोटो क्रमांक ः gad303.jpg
बसर्गे ः विद्यार्थ्यांचा सत्कार करताना अध्यक्षा श्रीमंत वर्षादेवी नाडगोंडे, सचिव आर. बी. टेळे, सरपंच भारती रायमाने, मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर व इतर मान्यवर.
-----------------------------------------
86794
व्यक्तिमत्त्व विकासाला महत्त्व द्या
वर्षादेवी नाडगोंडे ः बसर्गेत व्यक्तिमत्व विकास शिबिर
सकाळ वृत्तसेवा
दुगूनवाडी, ता. १ ः विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबर व्यक्तिमत्व विकासालाही महत्व देणे आवश्यक आहे. त्यासाठी संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बसर्गे एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत वर्षादेवी नाडगोंडे यांनी केले.
कै. श्रीमंत बाबासाहेब नाडगोंडे मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर व बसर्गे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने बसर्गेतील एस.एम.हायस्कूलमध्ये कै. श्रीमंत बाबासाहेब नाडगोंडे सरकार यांचा २६ वा पुण्यस्मरण व पाच दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिर समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सुनील सुतार यांनी आर्ट व क्राफ्टचे मातकाम शिकवले. गणपतराव पाटोळे यांनी मनोरंजनातून व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले. अनिल चौगुले यांनी हॉलीबॉल स्मॅशिंग कौशल्य याविषयी प्रत्यक्ष मैदानावर मार्गदर्शन केले. तेजस्विनी जोशी यांनी विद्यार्थ्यांना संस्काराचे महत्त्व पटवून दिले.
कै. बाबासाहेब नाडगोंडे-सरकार यांच्या प्रतिमेचे पूजन वर्षादेवी नाडगोंडे यांच्याहस्ते झाले. मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर यांनी प्रास्ताविक केले. शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत केले. सचिव आर. बी., टेळे, संचालक दुंडाप्पा कटकोळी, सरपंच सौ. भारती रायमाने, भागोजी कागीनकर, माजी लष्कर अधिकारी थोरात, महेशकुमार नाईक आदीसह पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. एस.बी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुनील रेडेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT