कोल्हापूर

जिल्हा परिषद ई प्रणाली

CD

जिल्हा परिषदेमध्ये आजपासून ‘ई ऑफिस’ प्रणाली
कार्तिकेयन एस. यांची माहिती : पंधरा दिवसांत ४८२ ई ऑफिस फाईल्सची निर्मिती

कोल्हापूर, ता. ३१ : जिल्हा परिषदेमध्ये उद्यापासून ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. ऑफलाईन आवक-जावकऐवजी ऑनलाईन आवक-जावक घेतली जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडे प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेली ई ऑफिस प्रणाली आता सर्व विभागात कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. गेल्या १५ दिवसांत ४८२ फाईल्स ई ऑफिस प्रणालीतून तयार केल्या आहेत. यामधील १८८ फाईल्स निर्गत झाल्या आहेत. २९४ फाईल्सवर सध्या कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज दिली.
ते म्हणाले, ‘जिल्हा परिषद ई ऑफिस प्रणालीचे सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. ई ऑफिस फाईल्स प्रणालीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद महाराष्ट्रात आघाडीवर आहे. राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या कामकाजात संगणकाचा जास्तीत जास्त वापर करून शासकीय कामकाज गतिमान केले जाणार आहे. प्रत्येक कामात सुसूत्रता आणली जाणार आहे. दस्तऐवज व माहिती सुरक्षित आणि जलद गतीने मिळाले पाहिजेत. उद्या (ता. १) पासून ऑफलाईन फाइल स्वीकारली जाणार नाही. ऑनलाइन टपाल देण्यासाठी सर्वसामान्यांना काही दिवस मदत केली जाईल. विभागाचे सर्व प्रश्न सोडवले आहेत. एक महिन्यात, सर्व जुनी कागदपत्रे स्कॅन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुढील टप्प्यात बीडीओ कार्यालय देखील ई ऑफिसमध्ये एकत्रित केले जाईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT