कोल्हापूर

प्रभात फिल्म कंपनी वर्धापनदिन

CD

87232
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे प्रभात फिल्म कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त प्रभात तुतारी शिल्पाचे पूजन झाले.

प्रभात फिल्म कंपनीच्या
स्मृतींना मिळाला उजाळा
कोल्हापूर, ता. १ : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे प्रभात फिल्म कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त आज कोळेकर तिकटी येथील प्रभात तुतारी शिल्पाचे पूजन झाले. यानिमित्ताने प्रभात फिल्म कंपनीच्या स्मृतींना उजाळा मिळाला. ज्येष्ठ वेशभूषाकार शामराव कांबळे, मिलिंद अष्टेकर यांच्या हस्ते तुतारी शिल्पाचे पूजन झाले. या वेळी चित्रपट महामंडळाचे संचालक सतीश बिडकर, रणजित जाधव, इम्तियाज बारगीर, बाळकृष्ण बारामती, मंगेश मंगेशकर, सुभाष कांबळे, समाधान सावंत, अमर मठपती, रवींद्र बोरगावकर आदी उपस्थित होते.
मराठी सिनेसृष्टीत इतिहास घडवणाऱ्या प्रभात फिल्म कंपनीची स्थापना १ जून १९२९ रोजी कोल्हापूर येथे झाली. पहिल्या दोन वर्षांतच गोपालकृष्ण (१९२९), खुनी खंजीर (१९३०), राणीसाहेब ऊर्फ बजरबट्टू (१९३०), उदयकाल (१९३०), चंद्रसेना (१९३१), व जुलूम (१९३१), असे सहा मूकपट निर्माण केले. खुनी खंजीरच्या छायाचित्रणाची त्यावेळी प्रशंसा झाली होती. या साऱ्या स्मृतींना उजाळा मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पोलिसांसोबत कर्तव्य बजावणारे ९०० होमगार्ड मानधनाविना

SCROLL FOR NEXT