कोल्हापूर

संविधान गटातर्फे आंदोलन

CD

अभ्यासक्रमात संविधानाचा
समावेश करा : संग्राम सावंत

कोल्हापूर, ता. १ : ‘‘शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा नाही तर, भारतीय संविधानाचा समावेश करा,’’ अशी मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संविधान गट व मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी केली.
मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेशाचा शासनाने प्रयत्न सुरु आहे. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी राजारामपुरीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संविधान गट आणि मुक्ती संघर्ष समितीतर्फे रॅली काढली. शाहू मिल येथे आंदोलन केले. संविधान गटातील व मुक्ती संघर्ष समिती, इतर संघटना संस्थांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
श्री. सावंत म्हणाले, ‘‘महाराष्ट्र शासनाला भारतीय शिक्षण व्यवस्थेत शालेय अभ्यासक्रमात समाविष्ठ करावयाचा असेल तर भारतीय संविधानाचा समावेश करावा. मनुस्मृतीच्या कायद्याचा उपयोग करुन भारतीय समाजाला गुलाम बनविण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. ही थांबवण्यासाठी आम्ही भारतीय संविधानाचा जागर घेऊन विरोध करणार आहोत.’’
डॉ. माधुरी चौगले म्हणाल्या, ‘‘स्त्रियांना शुद्र म्हणणाऱ्या मनुस्मृतीच्या काळ्या कायद्याचा धिक्कार करतो.’’ दाविद भोरे म्हणाले, ‘‘मनुस्मृतीच्या कायद्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करुन लहान मुलांपासून ते कॉलेज जीवनातील मुलांच्या डोक्यामध्ये विष टाकण्याचे काम शासन करत आहे का? संवैधानिक मार्गाने याचा निषेध तर करणारच आहोत आणि विरोध करुन जिल्ह्यात जनआंदोलन करू.’’
यावेळी विद्या शिंदे, शेखर कवाळे, अनिल कवाळे, बाळू कवाळे, अर्जुन बुचडे, महावीर दाभाडे, मंगल चौगुले, सुनीता रणदिवे, पौर्णिमा जाधव, रेखा दुबळे, गीता जाधव, शोभा साठे, विमल गरदे, शारदा बेळुंके, कल्पना कांबळे, सीमा बुचडे, मंगला उघडे उपस्थित होते. भारतीय संविधानाचे मूल्य आणि तत्त्वांचा समावेश करा. बालवाडीपासून ते एम.ए.एम., सीओएम., एमएससी या वर्गासाठी अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा समावेश व्हावा, अशी मागणी केली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक येथे सांगता सभा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

Hingoli Earthquake :हिंगोली जिल्हा भूकंपाने पुन्हा हादरला ;गडाळा, पांगरा शिंदे येथे केंद्रबिंदू; भिंतींनाही तडे

Latest Marathi News Live Update : अकोला दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री बावनकुळेंचा संवाद; पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश, २० वर्षे जुन्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची फाइल पुन्हा उघडली

SCROLL FOR NEXT