कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ निवेदन

CD

खेळाडूच्या खोट्या
प्रमाणपत्राची चौकशी व्हावी
‘मनसे’ विद्यार्थी सेनेचे विद्यापीठ प्रशासनाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : जिल्ह्यातील एका खेळाडूने शिवाजी विद्यापीठाचे खोटे प्रमाणपत्र तयार करून त्याचा गैरवापर केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. संबंधित खेळाडूने याबाबतचा खुलासा केला असला तरी त्याच्यावर कुणाचा दबाव आहे का? शिवाजी विद्यापीठाचे नाव बदनाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना देण्यात आले. याबाबतची माहिती शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे, संबंधित खेळाडूने खोटे प्रमाणपत्र केले. त्याची सखोल चौकशी करावी. विद्यापीठात खोट्या प्रमाणपत्राचे रॅकेट आहे का, याची देखील चौकशी करावी. संबंधित खेळाडूसोबत कोण कोण आहेत. त्यांच्या नावाचा खुलासा करावा. ज्या झेरॉक्स सेंटरमधून हे खोटे प्रमाणपत्र छापण्यात आले, त्यांच्यावर देखील गुन्हा नोंद करण्यात यावा. संबंधित खेळाडूवर कोणाचा दबाव आहे का व या खोटे प्रमाणपत्राचा खरा सूत्रधार कोण याची नावेही जाहीर करावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हरिश राणाचं निधन, १३ वर्षांच्या मरणयातनांमधून सुटका; भारतात पहिल्यांदाच इच्छामरण

Amazon Cloud Outage : ॲमेझॉन AWS वर ड्रोन हल्ला! UAE-बहारीन क्लाउड सेंटर ठप्प; भारतीय कंपन्यांसाठी चेतावणी, बँका-मोबाईल ॲप्स बंद

Farmers Protest : नांदगाव येथे महामार्ग रोको; आंबा-काजू बागायतदारांचा ‘वर्षा’वर धडक देण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : संभाजी नगरमध्ये वाहनांच्या गोडाऊनला आग

जगभरात गंभीर संकट, भारतासाठी चिंताजनक स्थिती; पण इंधन तुटवडा नाही; राज्यसभेत PM मोदींनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT