कोल्हापूर

सूर्यकांत मांडरे जयंती

CD

87262
सूर्यकांत मांडरे

अभिनेते सूर्यकांत मांडरे यांच्या
स्मृतींना मिळणार उजाळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेते सूर्यकांत मांडरे यांची उद्या (ता. २) जयंती असून त्यानिमित्ताने त्यांच्या विविध स्मृतींना उजाळा मिळणार आहे. याबाबतची माहिती स्वरुपा मांडरे-पोरे यांनी दिली.
मराठी चित्रपटसृष्टीत चंद्रकांत-सूर्यकांत या कोल्हापूरच्या दोन रांगड्या बंधूंनी मोठे योगदान दिले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज अशा त्यांच्या भूमिकांनी मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. सूर्यकांत मांडरे पाणीदार बोलके डोळे, मर्दानी बलदंड शरीर आणि रुबाबदार चालणे त्यामुळे ते शिवाजी महाराजांच्या भूमिकेत हुबेहूब उठून दिसायचे.
चित्रपट सृष्टीबरोबरच त्यांनी रंगभूमीही गाजवली. पाच ऐतिहासिक, वीस ग्रामीण, अकरा सामाजिक नाटकांमधून त्यांनी अभिनय साकारला. सिनेमा आणि नाटकाबरोबर त्यांना लेखनाची ही आवड होती. त्यांनी ‘धाकटी पाती‘ हे पुस्तक लिहिले, ज्याला राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. ‘कोल्हापुरी साज'', ‘विश्‍वकर्मा’ ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ते एक उत्तम चित्रकार व शिल्पकार होते. त्यांचा पावडर शेडिंगमध्ये हातखंडा होता. त्यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठात आर्ट गॅलरी व्हावी, अशी मागणी आहे. ती लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा असल्याचेही मांडरे- पोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Noida Owl Terror: कुत्रे-माकडांनंतर आता घुबडांची दहशत; थेट डोक्यावर झडप, शहरातील नागरिकांमध्ये पसरली आहे भीती

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT