कोल्हापूर

अमोल येडगे यांनी मतमोजणी केंद्राचा सुरक्षेचा आढावा

CD

87265
...
आयोगाचे ओळखपत्र असणाऱ्यांनाच
मतमोजणी केंद्रात प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.१ ः शासकीय कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांना निवडणूक आयोगाचे ओळखपत्र देण्यात आले आहे. तेवढ्या व्यक्तींनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. मतमोजणी केंद्रातील सुरक्षेसाठी बॅरिकेडस्‌ लावून प्रवेश निषिद्ध करण्यात आला असून सर्वत्र सीसीटीव्ही देखील लावण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी सुमारे ६०० पोलिस तैनात असणार आहेत. आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या सर्व सुरक्षा यंत्रणांचा आढावा घेतला.
कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील मतमोजणी मंगळवारी (ता. ४) सकाळी आठ वाजता सुरू होईल. सुरूवातीला टपाली मतदानाची मोजणी होईल. त्यानंतर विधानसभानिहाय फेऱ्या होतील. प्रत्येक विधानसभेसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक व्यस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी आवश्यक सर्व सुविधांची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. मतमोजणीसाठी आयोगाच्या सूचनांनुसार निश्चित केलेल्या आणि ओळखपत्र वितरीत केलेल्या अधिकारी, कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश असणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी मतमोजणी केंद्रावर सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक प्रकारच्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत. आज जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला. यामध्ये सीसीटीव्ही, बॅरिकेड्स, आत येण्याचा व बाहेर जाण्याचे मार्ग, सुरक्षा जाळी, ईव्हीएम मतमोजणी केंद्रात नेण्याचा मार्ग, गेटवरील व अंतर्गत पोलिस सुरक्षा, माध्यम कक्ष आदी ठिकाणी त्यांनी भेट देऊन कामांची माहिती घेतली व आवश्यक सूचना केल्या. यावेळी त्यांनी उमेदवार प्रतिनिधी आसन व्यवस्था, कुलर व्यवस्था, संगणक व्यवस्था आदी विषयांबाबत पाहणी करून कामाचा आढावा घेतला. निवडणुकीचा निकाल शांततेत व वेळेवर लागण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी ३४९ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त १० टक्के कर्मचारी राखीव असणार आहेत. या सर्व यंत्रणेला बसण्यासाठी जागा, पाण्याची, अल्पोपहार, भोजन, स्वच्छतागृह आदी सुविधा देण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT