कोल्हापूर

शाहूपुरीत तालमीचा ताबा पोलिस बंदोबस्तात, वातावरण तंग

CD

पोलिस बंदोबस्तात
शाहूपुरीत तालमीचा ताबा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः शाहूपुरी व्यापारी पेठेतील एका तालमीचे व्यवस्थापन मंडळ व अध्यक्ष पदावरून दोन गटांत वाद आहे. याप्रकरणी एका गटाला व्यवस्थापनाचे कामकाज करण्याचे आदेश दिले. मात्र, प्रतिस्पर्धी गट तालमीत येण्यास मज्जाव करीत होता. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात ताबा घेण्यासाठी गेलेला गट व प्रतिस्पर्धी समोरासमोर आल्याने या परिसरातील वातावरण काहीकाळ तंग होते.
शाहूपुरी व्यापारी पेठेतील प्रसिद्ध जयभवानी शाहूपुरी तालमीतील व्यवस्थापन व अध्यक्षपदावरून मार्गदर्शक व प्रशिक्षकांच्या दोन गटांत वाद आहे. याबद्दल धर्मादाय आयुक्तांकडे हे प्रकरण प्रलंबित होते. त्याचा निकाल एक एप्रिल २०२४ ला एका गटाच्या बाजूने लागला. या आदेशात या गटाला व्यवस्थापन बघण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, समोरील गट या गटाला तालमीत येण्यास मज्जाव करीत होता. अनेक दिवस प्रयत्न करूनही यात यश येत नव्हते. अखेर आज शाहूपुरी पोलिसांत अर्ज देऊन रितसर पोलिस बंदोबस्त घेण्यात आला. त्यांच्या मदतीने या आदेशानुसार तालमीत प्रवेश करण्यासाठी आलेल्या गटाला प्रतिस्पर्धी गटाने जोरदार विरोध दर्शविला. या वादावादीमुळे दुपारी या परिसरात वातावरण तंग बनले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट

Class One Sports Officer: माळशिरसचा रुद्रांक्ष ठरला पहिला! क्रीडा अधिकारीपदी ‘क्लास वन’ निवड होण्याचा मान; नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी

Kalyan Latur Expressway : माळशेज घाटात होणार 8 किलोमीटर लांबीचा बोगदा; 35 हजार कोटींच्या 'जनकल्याण एक्सप्रेसवे'ला सरकारची मान्यता, नव्या महामार्गाची काय वैशिष्ट्ये?

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं स्वस्त! तब्बल 10 हजारांनी घसरण, आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT