कोल्हापूर

गड-डेव्हलपमेंन्ट फुटबॉल

CD

फोटो क्रमाक gad216.jpg

87347

सौरभ मोहिते, अमर गवळीला मागणी
शिवराज -युनायटेड डेव्हलपमेंन्ट लीग : दोन तास रंगली ९० खेळाडूंसाठी बोली

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. २ : शिवराज युनायटेड फुटबॉल डेव्हलपमेंन्ट लीगसाठी खेळाडूंच्या बोलीचा कार्यक्रम उत्कंठावर्धक वातावरणात दोन तास रंगला. फुटबॉलपटू सौरभ मोहिते ( १२००) अमर गवळी (१०००), आर्यन दळवी, यश पाटील ( ८००) गुण मिळवून हिरो ठरले. पाठोपाठ श्रवण जाधव, धीरज कुरबेट्टी, सूरज हनिमनाळे यांनी प्रत्येकी ५०० गुण मिळवत लक्षवेधी ठरले. एकूण सहा संघांसाठी ९० फुटबॉलपटूंवर नगरपालिकेच्या प्रांगणात ही बोली लागली. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे गुरुवारपासून ही लीग होणार आहे.
शिवराज विद्या संकुलाचे प्रा. विश्वजीत कुराडे यांच्याहस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली. सहा संघांचे किटचे अनावरण युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जून बेल्लद, संघर्षचे गुंडू पाटील, श्रेयस-अर्थवचे नंदू पाटील, अलीखान पठाण, गौस मकानदार, नगरपालिकेचे सागर यावारी यांच्या हस्ते झाले. प्रशिक्षक म्हणून सौरभ पाटील, यासीन नदाफ, ओमकार सुतार, सुल्तान शेख, तानाजी देवेकर, महेश सुतार यांची ड्रॉमधून निवड झाली. कर्णधार म्हणून आर्यन दळवी, सुमित कांबळे, पवन गुंठे, हर्षल कुरळे, यश पाटील, सौरभ मोहिते यांना निवडण्यात आले. गुंडू पाटील यांचे भाषण झाले.
सौरभ मोहितेने सर्वाधिक गुण मिळवून बाजी मारली. चांगले खेळाडू घेण्यासाठी संघ मालकात चढाओढ रंगली होती. पंधरा, सतरा, एकोणीस आणि एकवीस वर्षाखालील अशा नव्वद खेळाडूंची बोली लागली. खेळाडूंतही बोली किती लागणार, याची उत्सुकता दिसली. अभिजित चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी अरुण पाटील, समन्वयक अनिकेत कोले, अभिषेक पोवार, ओमकार जाधव यांच्यासह खेळाडू,पालक उपस्थित होते. सौरभ जाधव, प्रनाम प्रसादी यांनी गुणांचे निरीक्षण केले. ललित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. रोहित साळोखे यांनी आभार मानले.

चौकट..
पालक, माजी खेळाडूंचे संघ
नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी डेव्हलपमेंन्ट फुटबॉल लीग होत आहे. या संघाच्या मालकीसाठी युनायटेडच्या पालकांनी गुफा गार्डीयन, माजी खेळाडूंनी रायझिंग स्टार्स, इफा लायन्स, दादा जीएम, श्रेयस-अथर्व वॉरियर्स संघाची मालकी स्वीकारली. स्थानिक प्रतिभावंत फुटबॉलपटूंना बळ देण्यासाठी पालक, माजी खेळाडूंचा सहभाग कौतुकाचा विषय ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT