कोल्हापूर

वाहनधारक आंदोलन इशारा

CD

अन्यायकारक पासिंग दंड रद्द करा
सुभाष जाधव : अन्यथा, चक्का जाम आंदोलन करणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : राज्य शासनाच्या परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भिमनावर यांनी नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार पासिंग न झालेल्या व्यावसायिक वाहनधारकांवर प्रतिदिन पन्नास रुपयांप्रमाणे दंड आकारणी सुरू झाली आहे. या दंड आकारणीला विविध व्यावसायिक वाहनधारकांच्या संघटनांनी विरोध दर्शविला असून, याबाबत लवकरच जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन विभागासह मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देण्यात येणार आहे. त्याची दखल न घेतल्यास चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा लॉरी ऑॅपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिला.
ते म्हणाले, ‘राज्यातील व्यावसायिक वाहनधारकांत रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो, टँकर, डंपर, बस अशा वर्गातील पासिंग न झालेल्या वाहनांना प्रतिदिन ५० रुपये दंड लावण्यात येणार आहे. या दंडात्मक कारवाईत २०१६ पासूनची वसुली होणार आहे. ही अन्यायकारक बाब आहे. ही दंडात्मक कारवाई जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत कोल्हापूरसह राज्यातील सर्व व्यावसायिक वाहनधारकांच्या संघटना टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहेत.’
दरम्यान, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस, नवी दिल्ली तर्फे दंडात्मक कारवाई रद्द होण्यासाठी लढा उभारला आहे. या लढ्याला येथील शिरोली-नागाव ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष कुलभूषण कोळी यांनी पाठिंबा दिला. तसेच शिरोली टेम्पो असोसिएशनचे गिरी गोसावी, आदर्श टेम्पो युनियनचे संचालक सुरेश सूर्यवंशी, स्वाभिमानी माल ट्रक वाहतूक संघटनेचे सचिव युवराज पाटील, वाळू वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष विजय तेरदाळकर यांनी आंदोलनास पाठींबा दिला. लॉरी ऑपरेटर ही संस्था जिल्ह्याची शिखर संघटना आहे. आम्ही सदैव आमच्या ट्रकसह आंदोलनात सहभागी होणार असल्याचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितले.
उपाध्यक्ष भाऊ घोगळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी असोसिएशनचे प्रकाश केसरकर, हेमंत डिसले, शिवाजी चौगुले, विलास पाटील, विजय भोसले, रमेश कनेरकर, राजेश हात्तळी, महादेव माने, उत्तम पसारे, आदी उपस्थित होते. सचिव हेमंत डिसले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी अखेर निर्दोष, अमित शहा मानहानी प्रकरणात सुल्तानपूर कोर्टाचा मोठा दिलासा

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लेटमार्क! मध्य रेल्वेवर वाहतूक विस्कळीत, लोकलचा १५-२० मिनिटं खोळंबा

Ashirvad Sooryavanshi Century: १९ चौकार, ६ षटकार... ११९ चेंडूंत १६८ धावा! वैभव सूर्यवंशीच्या भावाने गाजवले मैदान Video

राष्ट्रपती भवनाजवळ नॉर्थ ब्लॉकमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी

Pune News: पुणेकरांना दिलासा! जीपीएस यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त; रखडलेल्या जमीन मोजण्या पुन्हा सुरू होणार

SCROLL FOR NEXT