कोल्हापूर

अंबाबाई दर्शन गर्दी

CD

फोटो ः 87328, 87330

सव्वा लाखांवर भाविकांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन
दोन दिवसांतील चित्र; शहरात वाहनांच्या रांगा; जोतिबा डोंगर, नृसिंहवाडीतही पर्यटकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : पुढील आठवड्यापासून शाळा सुरू होणार असल्याने आज रविवारच्या सुटीचा दिवस पकडून शहरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. त्यामुळे श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी पर्यटकांची रांग भवानी मंडपापर्यंत पोहचली. दोन दिवसांत सव्वा लाखांवर पर्यटकांनी दर्शन घेतले. त्यात शनिवारी (ता. १) ५२ हजार ४२० तर रविवारी (ता. २) ७४ हजार १९३ भाविकांचा समावेश होता. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जोतिबा, नृसिंहवाडीतही पर्यटकांची मोठी गर्दी होती.
नवीन शैक्षणिक वर्षाला पुढील आठवड्यापासून सुरुवात होत आहे. त्यामुळे या शनिवार-रविवारची सुटी पकडून अनेकांनी देवदर्शन तसेच विविध पर्यटनस्थळी भेटी देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार कालपासूनच पर्यटक मोठ्या संख्येने शहरात दाखल होत होते. उन्हाचा तडाखा वाढलेला असल्याने रात्री विश्रांती घेऊन सकाळी लवकर अंबाबाई दर्शन घेण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे आज सकाळपासून दर्शनासाठी गर्दी झाली होती. पर्यटकांसाठी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या दारात मंडपातून रांग लावण्यात आली होती. अनेकवेळा ही रांग भवानी मंडपापर्यंत पोहोचत होती.
अंबाबाई मंदिरासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची बिंदू चौकात, कॉमर्स कॉलेज रस्ता, मिरजकर तिकटी रस्ता, दसरा चौक, छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरात गर्दी झाली होती. अनेकजण पार्किंगची जागा मिळवण्यासाठी फेऱ्या मारत होते. यामुळे बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, टेंबे रोड, शाहू मैदान रोडवर वाहतुकीची कोंडी होत होती. रंकाळा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची वाहने तलावाच्या परिसरात तसेच ताराबाई रोडला लावण्यात आली होती.
अनेकजण जोतिबा-पन्हाळा करून आले होते, तर अंबाबाईचे दर्शन करून तिकडे जाणारेही अनेक होते. त्याचबरोबर नवीन राजवाडा परिसर, पंचगंगा नदी घाटावरही पर्यटकांची वाहने होती. याबरोबरच जोतिबा, पन्हाळा, नृसिंहवाडी, आंबा घाट, आदमापूर आदी ठिकाणीही पर्यटकांची गर्दी होती.

चौकट
खरेदीसाठी पर्यटकांना संधी
आज थोडे ढगाळ वातावरण असल्याने पर्यटकांना विविध खरेदीसाठी संधी मिळाली. मंदिराच्या परिसरात, महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, पापाची तिकटी, चप्पल लाईन येथे पर्यटकच दिसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT