कोल्हापूर

भाकप आंदोलन

CD

शालेय अभ्यासक्रमाच्या मसुद्यातून
मनुस्मृतीचे श्र्लोक वगळण्याची मागणी

पुरोगामी संघटनांतर्फे मनुस्मृतीचे काहिलीत विसर्जन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : शासनाने शालेय अभ्यासक्रमाचा मसुदा नुकताच जाहीर केला. त्यातील मनुस्मृतीचे श्र्लोक वगळावेत. अन्यथा, चौकाचौकांत मनुस्मृतीचे दहन करण्याचे आंदोलन करू, असा इशारा भाकपचे सचिव सतीशचंद्र कांबळे यांच्यासह विविध पुरोगामी चळवळीतील नेत्यांनी आज येथे दिला.
शालेय अभ्यासक्रमातून मनुस्मृतीमधील श्लोक समाविष्ठ असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत निदर्शने करण्यात आली. तसेच मनुस्मृतीचे काहिलीत विसर्जन करण्याचे प्रतीकात्मक आंदोलन शिवाजी चौकात केले. यावेळी ते बोलत होते. प्रागतिक पुरोगामी पक्ष व संघटनांनी सामुदायिकरित्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शालेय अभ्यासक्रमातील मसुद्यातील मनुस्मृतीचे श्लोक शासनाने रद्द करावेत, अशी मागणी केली आहे. त्याबाबत लोकजागृती करण्याचा भाग म्हणून शिवाजी चौकात निदर्शने होत असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
शिवसेनेचे नेते विजय देवणे म्हणाले, ‘सर्वच मंत्री संविधानाची शपथ घेऊन कोणत्याही प्रकारची विषमता आम्ही येऊ देणार नाही, असे सांगत असताना मनुस्मृतीचे समर्थन करणे राज्य सरकार घटना विरोधी कृत्य करत आहे. त्यामुळे या शैक्षणिक आराखड्याला मंजुरी देणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी ताबडतोब राजीनामा द्यावा.’
चंद्रकांत यादव, शेकापचे बाबुराव कदम, बी. एल. बर्गे, दगडू भास्कर, गणेश नलावडे, सचिन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. सामुदायिकरित्या मनुस्मृतीची प्रत काहिलीमध्ये बुडविण्यात आली. रामराजे कुपेकर, बाळासाहेब बर्गे, डॉ. टी. एस. पाटील, विजय अकोलकर, दिलदार मुजावर, इर्शाद फरास, रमेश वडणगेकर, संभाजी जगदाळे, आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT