कोल्हापूर

मुंबई बॉम्बस्फोटातील अन्य आरोपींच्या सुरक्षेत वाढ

CD

87452 स्वाती साठे
...
मुंबई बॉम्बस्फोटातील अन्य आरोपींच्या सुरक्षेत वाढ
कळंबा कारागृहात चार आरोपी : अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न ऐरणीवर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मुन्ना ऊर्फ मोहम्मद अलीखान ऊर्फ मनोजकुमार गुप्ता याचा कळंबा कारागृहात रविवारी खून करण्यात आला. मुन्नासह बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी ठरलेले चार आरोपीही सध्या कळंबा कारागृहात आहेत. खुनाच्या घटनेनंतर अन्य आरोपींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
टाडा न्यायालयाने २००६ साली मुंबई स्फोटातील शंभरजणांना दोषी ठरविले होते. त्‍या सर्व आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. हत्यारे पुरविल्याप्रकरणी मुन्ना गुप्ताला दोषी ठरवून आजन्म कारावासात रवानगी करण्यात आली होती. पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्न केलेला कस्टम अधिकारी उत्तम शांताराम पोतदार, तत्कालीन उपनिरीक्षक विजय कृष्णाजी पाटील, महमंदरफीक उस्मान शेख व शहानवाज अब्दुल कादर कुरेशी हे चौघे सध्या कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. रविवारच्या घटनेनंतर चौघांना वेगवेगळे ठेवण्यात आले. तसेच अतिरिक्त पोलिसांची नेमणूक करण्यात आल्याचे कारागृह अधीक्षक विवेक झेंडे सांगितले.
...
अपुऱ्या मनुष्यबळामुळे डोकेदुखी
कळंबा कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा जादा बंदी आहेत. एकूण क्षमता १६९९ असताना प्रत्यक्षात २१८० बंदी आहेत. यामध्ये भारतातील अनेक कुख्यात गुंडासह परदेशी बंदीही ठेवण्यात आले आहे. सध्या केवळ १५८ कर्मचाऱ्यांवर बंदोबस्ताची मदार असून, १३६ पदे रिक्त आहेत. अधिकारी दर्जाच्या १७ जागा रिक्त असल्याने कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
...
मोबाईल, गांजामुळे वाढला ताण
कारागृहात मोबाईल, गांजा सापडण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. तत्कालीन कर्मचारीच यामध्ये सामील असल्याचे पुढे आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तर काही दिवसांपूर्वीच ११ जणांना निलंबित करण्यात आले. मागील वर्षभरात प्रभारी अधीक्षकांच्याही वारंवार बदल्या होत असल्याने प्रशासनावर ताण वाढल्याचे दिसते. भिंतीवरून, न्यायालयीन सुनावणी किंवा वैद्यकीय तपासणीवेळी बाहेरून येताना चप्पल, कपड्यातून मोबाईल आणण्याचे प्रकार घडतात.
...

‘कारागृहाच्या कानाकोपऱ्यात लक्ष ठेवता यावे, यासाठी कारागृहातील सीसीटीव्हींची संख्या वाढविण्यात येणार आहे. जमिनीत लपवलेले मोबाईल शोधण्यासाठी डीप मेटल डिटेक्टरची खरेदी तसेच आवश्यक मनुष्यबळ तातडीने भरावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. : स्वाती साठे, उपमहानिरीक्षक, राज्य कारागृह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

Gangapur VIP Facility: गंगापूरमध्ये ३.७० कोटींच्या व्हीआयपी विश्रामगृहाचे लोकार्पण; शासकीय निवासस्थानांमुळे अधिकारी मुख्यालयी राहणार

SCROLL FOR NEXT