कोल्हापूर

विद्यार्थ्यांना मिळाले रोबोट तयार करण्याचे धडे

CD

फोटो : 87359
-----------------------------------------
(टीप : ‘एनआयई’ चा लोगो आवश्‍यक)
.......................................................

रोबोटिक प्रशिक्षण शिबिराचा समारोप
सकाळ व रोबोस्टॉर्म टेक्नॉलॉजीतर्फे आयोजन; विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : लहान वयातच नवतंत्रज्ञान आत्मसात करून लिलया रोबोट तयार करण्याचे धडे विद्यार्थ्यांना मिळाले. काही तरी नवीन करू शकतोय हा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आणि आपली मुले वेगळं काही तरी करताहेत हे पाहून आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आज अनुभवायला मिळाला. निमित्त होतं ''सकाळ'' माध्यम समूहाच्या एनआयई व्यासपीठ व रोबोस्टॉर्म टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोबोटिक प्रशिक्षण शिबिराचे.
''सकाळ'' शहर कार्यालयात सुरू असलेल्या शिबिराचा समारोप झला. ‘गमभन’ वितरण हे मुख्य प्रायोजक होते.
समारोपप्रसंगी ''सकाळ''चे सरव्यवस्थापक (दक्षिण महाराष्ट) यतिश शहा, ''गमभन''चे संचालक वीरेंद्रनाथ जोशी, रोबोस्टॉर्म टेक्नॉलॉजीचे संचालक आशिष देसाई, सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्रांचे वितरण झाले.
श्री. शहा यांनी विद्यार्थ्यांना सकाळ ‘एनआयई’बाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना सामान्यज्ञानाची माहिती देणारे हे वृत्तपत्र असून, पालकांनी अंकाची नोंदणी करावी, असे आवाहन शहा यांनी केले.
‘रोबोस्टॉर्म’च्या रीना अंगडी, विकास भंडारी, परेश उपाध्ये, सुयश पवार, प्रभाकर बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी ‘फोरव्हील बेस’ रोबोट, दुसऱ्या दिवशी कॅस्टर व्हील बेस रोबोट, तिसऱ्या दिवशी ग्रीपर रोबोट तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. अखेरच्या दिवशी विद्यार्थ्यांना थ्री डी प्रिंटिंग व पुली वुईथ क्रेन तयार करण्याचे धडे देण्यात आले. थ्री डी प्रिंटिंगचा ज्वेलरीमध्ये व फौंड्री पॅटर्नमध्ये कशा पद्धतीने वापर करायचा याचीही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देणार : कृषिमंत्री भरणे; पीक कापणी प्रयोग पारदर्शकपणे करण्याचे निर्देश

Marathi News Live Updates : शिरोलीत मिरवणुकीत होमगार्डला धक्काबुक्की; पोलिस अधिकारी सुनील गायकवाड, शशिकांत खवरे यांच्यात वादावादी

Pune-Beed Railway : मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र जोडणारी पुणे-बीड रेल्वे धावली; 22 सप्टेंबरपासून नियमित प्रवास सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे!

काळाचौकी महागणपतीच्या मंडपात शॉक लागून ८ वर्षीय चिमुकलीसह दोघांचा मृत्यू, तिघांवर ICUमध्ये उपचार सुरू

Ganeshotsav Return Travel : बाप्पाला निरोप देऊन परतणाऱ्या चाकरमान्यांची परतीची वाट बिकट; चिपळूणमध्ये सीएनजीसाठी 10 तास प्रतीक्षा, पंपांवर वाहनांच्या लांब रांगा

SCROLL FOR NEXT